Pune Cyber Crime | लग्न करण्याच्या बहाण्याने महिलेने तरुणाला लावला 9 लाखांना चुना

महिलेने जीवन साथी डॉट कॉमवर या संकेतस्थळावर आपले बनावट प्रोफाईल बनविले. या प्रोफाईल द्वारे पीडित तरुणाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्याद्वारे त्याच्या मैत्री केली. त्यानंतर मला तुमच्या सोबत लग्न करायचे आहे असे सांगितले. त्यानंतर पीडिताला प्रेमाच्या जाळ्यात अडकवत त्याची प्रॉपर्टी स्वतः:च्या नावावर करून घेतली.

Pune Cyber Crime | लग्न करण्याच्या  बहाण्याने महिलेने तरुणाला लावला 9 लाखांना चुना
सांकेतिक छायाचित्र Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 6:39 PM

पुणे – सायबर गुन्हेगारीच्या (cyber crime ) घटना वाढत असतानाच , लग्न जमावणाऱ्या विवाह संस्थामधून मोठया बनावट प्रोफाईल बनवत नागरिकांची फसवणूक केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेक तरुणांनी फसवणूक केल्याचे आपण ऐकले आहे. मात्र या घटनेत चक्क महिलेने विवाह नोंदणी संकेतस्थळावर (website )खोटी माहिती टाकून सुमारे 9  लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी गोव्यातून महिलेला अटक केली आहे. या आरोपी महिला न्यायालयात (Court )हजर करण्यात आले असून तिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत बंडगार्डन येथील 36  वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. महिलेचे लोकेशन तपासात गोव्यातून महिलेला अटक केली आहे. तिच्याकडून फसवणूकीच्या रक्कमेपैकी 5 लाख 5 हजार रुपये गोठविण्यात आले आहेत. उर्वरित 4 लाख 19 हजार रुपये जप्त करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहे.

अशी केली फसवणूक-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महिलेने जीवन साथी डॉट कॉमवर या संकेतस्थळावर आपले बनावट प्रोफाईल बनविले. या प्रोफाईल द्वारे पीडित तरुणाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्याद्वारे त्याच्या मैत्री केली. त्यानंतर मला तुमच्या सोबत लग्न करायचे आहे असे सांगितले. त्यानंतर पीडिताला प्रेमाच्या जाळ्यात अडकवत त्याची प्रॉपर्टी स्वतः:च्या नावावर करून घेतली. तसेच वेळोवेळी मेडिकलचे कारण सांगत पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करायला लावले. पैसे जमा होताच आरोपी महिलेने पीडितव्यक्ती सोबत संपर्क करणे बंद केले. पीडिताने संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता फोन बंद येऊ लागल. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे पीडित व्यक्तीच्या लक्षात आहे. त्यानंतर त्याने पोलिसात धाव घेत फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.

मुद्देमाल जप्त

तक्रारीची दाखल घेऊन पोलिसांनी तपास सुरु केला आहे. त्यानंतर महिलेचे लोकेशन तपासात गोव्यातून महिलेला अटक केली आहे. तिच्याकडून फसवणूकीच्या रक्कमेपैकी 5 लाख 5 हजार रुपये गोठविण्यात आले आहेत. उर्वरित 4 लाख 19 हजार रुपये जप्त करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहे. याबरोबरच महिलेसोबत आणखी साथीदार आहेत का? याचा शोध घेतला जात आहे.

Ambernath Crime : अंबरनाथच्या चिखलोली धरणात अज्ञात मृतदेह आढळला, शिवाजी नगर पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद

Nashik Pawan Express Derailed : नाशिकमध्ये पवन एक्स्प्रेस घसरुन एकाचा मृत्यू, भीषण अपघाताचे फोटो

National kusti championship : कविटगावच्या पैलवानाचं ‘यश’; कुस्ती स्पर्धेत केली रौप्य पदकाची कमाई

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.