‘केंद्र सरकारने हस्तक्षेप कारणे खूप सकारात्मक’ या कायदेतज्ज्ञांनी सीमावादाबाबत ‘या’ राज्यांचा दिला दाखला

आसाम-मेघालयचा प्रश्न सोडवला जाऊ शकतो, मग या बैठकीतही महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर आजच्या बैठकीत ठोस चर्चा का होऊ शकली नाही असंही त्यांनी विचारलं आहे.

'केंद्र सरकारने हस्तक्षेप कारणे खूप सकारात्मक' या कायदेतज्ज्ञांनी सीमावादाबाबत 'या' राज्यांचा दिला दाखला
Follow us
| Updated on: Dec 14, 2022 | 10:00 PM

मुंबईः कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील काही गावांवर दावा केला होता. त्यानंतर सीमावादाची नवी ठिणगी पडल्यामुळे दोन्ही राज्यातील राजकीय वातवरण प्रचंड तापले होते. दोन्ही राज्यात ठोशास ठोसा या भूमिकेतून वातावरण ढवळून निघाले. त्यानंतर सीमावादामध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप करून हा वाद सोडवण्याची मागणी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील राजकीय पक्षांसह नेत्यांनी केली होती.

त्यानंतर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर कायदेतज्ज्ञ आसीम सरोद यांनी या भेटीविषयी आशावादी चित्र असल्याचे सांगितले आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाविषयी बोलताना आसीम सरोदे यांनी त्याविषयी बोलताना सांगितले की, केंद्र सरकारने हस्तक्षेप करणे हे खूप सकारात्मक असल्याचे सांगितले मात्र त्याचवेळी त्या बैठकीत काहीच साध्य न होणं हे चुकीचं आहे असंही मत त्यांनी व्यक्त केले.

सीमावादाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानादेखील यामध्ये हस्तक्षेप करत विषय सोडवता आला असता मात्र तसे झाले नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

आसाम आणि मेघालय या दोन्ही राज्यांचा सीमावादच होता. मात्र त्यावेळी अमित शहा यांनी हस्तक्षेप करून तो सीमावाद सोडवला. मग महाराष्ट्र आणि कर्नाटकचा का नाही सोडवता येऊ शकत असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

आसाम-मेघालयचा प्रश्न सोडवला जाऊ शकतो, मग या बैठकीतही महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर आजच्या बैठकीत ठोस चर्चा का होऊ शकली नाही असंही त्यांनी विचारलं आहे.

आसाम आणि मेघालयमध्ये भाजपशासितच सरकार होती. त्यामुळे केंद्राच्या मदतीने हा प्रश्न सोडवता आला असता मात्र तसे झाले नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये भाजपचेच सरकार आहे. त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते आि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मध्यस्ती करणे ही अपेक्षित होते आणि ते त्यांना शक्यही आहे असंही त्यांनी मत मांडले.

कायदेतज्ज्ञ आसीम सरोदे यांनी सीमावादावर बोलताना सांगितले की, दोन्ही राज्यांना एकत्रित घेऊन एक ऍफीडेव्हीट तयार केले असते तर सुप्रीम कोर्टातील सीमावादाविषयीची केसच संपली असती आणि ते करणे शक्य होते असं कायद्याचा आधार घेत त्यांनी माहिती सांगितली. यावेळी त्यांनी आज दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अमित शहा यांनी फक्त समजूत दिली असल्याचेही त्यांनी माहिती दिली.

आजच्या बैठकीत अमित शहा यांनी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना घेऊन चर्चा केली आहे. मात्र मराठी आणि कानडी माणसांची माथी भडकवून निवडणुका घेणे हेच यामधील राजकारण आहे असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.