Pune Anurag Thakur : खेळाल तर मानसिक व शारीरिक तंदुरुस्त राहाल, पुण्यातल्या कार्यक्रमात अनुराग ठाकुरांनी सांगितलं खेळाचं महत्त्व
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात क्रीडा संकुलाच्या कार्यक्रमावेळी अनुराग ठाकूर आणि सूनेत्रा पवार यांनी लेझर फायरिंग केले. अंजली भागवत यांनी मार्गदर्शन केल्यावर सुनेत्रा पवार यांनी लेझर फायरिंग केले.
पुणे : पुणे विद्यापीठातील या क्रीडासंकुलाला आपण खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) नाव ठेवले, यासाठी मी आभार मानतो. स्वामी विवेकानंद हे आपले प्रेरणास्थान आहेत. खेळाल तर मानसिक व शारीरिक तंदुरुस्त राहाल. नरेंद्र मोदीही खेळाला प्रोत्साहन देतात, असे वक्तव्य क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी केले आहे. ते पुण्यात बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पै. खाशाबा जाधवांच्या नावाने उभारलेल्या क्रीडा संकुलाचे आज उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. म्हणाले, की नीरज चोप्राने भारताला गोल्ड मेडल दिले. कपील देव यांनी जसा वर्ल्ड कप जिंकला आणि आपण मागे फिरलोच नाही. दरम्यान भारतीय क्रिकेट संघाची आर्थिक अवस्था वाईट होत आहे. मात्र आता भारतातच आयपीएल (IPL) होत आहे. जगभरातील खेळाडू इथे येऊन खेळतात, असे ठाकूर यांनी सांगितले.
‘स्पर्धेतून चांगले खेळाडू मिळतील’
भारतात 1 हजार प्रशिक्षण संस्था उभारण्याचे उद्दिष्ट आहे. खेळाडूला 5 लाख रुपयांची प्रोत्साहनपर मदत आपण करत आहोत. भारताची सॉफ्ट पॉवर ही चित्रपट आणि खेळ आहे. मोदी खेळाडूंसोबत बोलतात, त्यांचे मनोबल वाढवतात. फक्त पदके घेऊन येणाऱ्यांसाठी नाही तर सगळ्यांशी बोलतात, असे ठाकूर यांनी सांगितले आहे. पुणे विद्यापीठाने खेळातही चांगली कामगिरी केली आहे. मल्लखांब, खो खो या पारंपरिक खेळांना भविष्य आहे. खेलो इंडिया युथ गेम्समध्ये 8 हजार खेळाडू भाग घेतील. हरयाणात याचे आयोजन करण्यात आले आहे. माझे कुलगुरूंना सांगणे आहे, की आधी पुण्याच्या महाविद्यालयाच्या स्पर्धा घ्या. त्यातून चांगले खेळाडू मिळतील, असे ठाकूर म्हणाले.
लेझर फायरिंग
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात क्रीडा संकुलाच्या कार्यक्रमावेळी अनुराग ठाकूर आणि सूनेत्रा पवार यांनी लेझर फायरिंग केले. अंजली भागवत यांनी मार्गदर्शन केल्यावर सुनेत्रा पवार यांनी लेझर फायरिंग केले. शूटिंग रेंजच्या सभागृहात हातात शुटिंग रायफल घेत एक आगळावेगळा अनुभव त्यांनी घेतला. यावेळी नेम धरत सुनेत्रा पवारांनी फायर केले. तर अनुराग ठाकूर यांनीही त्याचवेळी फायरिंग केले.