Pune electricity : पुण्यातल्या कोंढव्याच्या वीजवितरण कार्यालयात तोडफोड; खंडित वीजपुरवठा आणि वाढीव बिलावरून संताप अनावर

पुण्यातील नागरिक आता या खंडित वीजपुरवठ्यावरून आक्रमक झाले आहेत. वीजबिलाच्या प्रश्नावरून तसेच सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या कारणावरून एका नागरिकाने कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून तोडफोड केली.

Pune electricity : पुण्यातल्या कोंढव्याच्या वीजवितरण कार्यालयात तोडफोड; खंडित वीजपुरवठा आणि वाढीव बिलावरून संताप अनावर
संतप्त नागरिकाने केली वीजवितरण कार्यालयात तोडफोडImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 11:53 AM

पुणे : पुण्यातील वीज वितरण कार्यालयाची तोडफोड (Vandalism) करण्यात आली आहे. वीज खंडित केल्याच्या रागातून ही तोडफोड करण्यात आली आहे. शिवाय वाढीव वीजबिल आल्यामुळे अनेकांचा संताप झाला आहे. याच रागातून ही तोडफोड करण्यात आली आहे. कोंढवा (Kondhwa) परिसरातील वीज वितरणच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. दरम्यान, कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मागील काही दिवसांपासून भारनियमनाने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. उन्हाळ्यात वीजेची मागणी वाढते. तर राज्यात कोळसा टंचाई असल्यामुळे भारनियमन करावे लागत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. मात्र या सर्वांचा परिणाम सर्वसामान्यांवर होत आहे. अनेक राजकीय पक्षही आक्रमक भूमिका यावरून घेत आहेत. त्यामुळे वारंवार होणाऱ्या भारनियमनामुळे नागरिकांनी थेट महावितरणच्या श्का(Mahavitaran) कार्यालयात जाऊन तोडफोड केली आहे.

महावितरणच्या कार्यपद्धतीचा विरोध

अनेक ठिकाणी भारनियमन सुरू असल्याने स्थानिक नागरिक वीजवितरण कंपनीवर आपला रोष काढत आहेत. काही ठिकाणी बिले थकवल्याचे कारण देत वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी वीजेची टंचाई म्हणत महावितरणतर्फे वीज गायब केली जात आहे. ग्रामीण भागात तर परिस्थिती अधिकच बिकट आहे. सहा ते आठ तास भारनियमन सुरू असून शेतकरीही त्रस्त झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

अधिकारी, कर्मचाऱ्यांशी हुज्जत

पुण्यातील नागरिक आता या खंडित वीजपुरवठ्यावरून आक्रमक झाले आहेत. वीजबिलाच्या प्रश्नावरून तसेच सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या कारणावरून एका नागरिकाने कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून तोडफोड केली. तसेच पोलिसांना बोलवा, 100 नंबरवर फोन करा. मी एकटाच इथली तोडफोड करेल, असेही संबंधित व्यक्ती बोलत असतानाचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर वीज कनेक्शनची रक्कम भरावीच लागेल, असे वीजवितरण कार्यालयातील कर्मचारी बोलत असल्याचेही व्हिडिओमध्ये ऐकायला मिळते.

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.