Azadi Ka Amrit Mahotsav : देशभर साजरा होतोय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; पुणे जिल्ह्यातही राबवले जातायत विविध उपक्रम, वाचा…

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन एका दिवसावर येवून ठेपला आहे. त्यानिमित्त विविध जिल्ह्यांतील प्रशासकीय इमारतींवरही (Administrative buildings) आकर्षक रोषणाई पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील काही ठिकाणचा आढावा आम्ही घेतला आहे.

Azadi Ka Amrit Mahotsav : देशभर साजरा होतोय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; पुणे जिल्ह्यातही राबवले जातायत विविध उपक्रम, वाचा...
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुणे जिल्ह्यातील उपक्रम, रोषणाई Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 13, 2022 | 12:18 PM

पुणे : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Azadi Ka Amrit Mahotsav) हा देशभर साजरा होत आहे. यानिमित्त विविध उपक्रम देशभरात राबविले जात आहेत. पुणे जिल्ह्यातही विविध संस्था, सरकारी आस्थापना आदींतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. काही ठिकाणी आकर्षक अशी विद्युत रोषणाई (Attractive lighting) करण्यात आली आहे, काही ठिकाणी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. काही ठिकाणी सायकल स्पर्धा, कवायती, तिरंगा फेरी असे विविध उपक्रम राबवले जात आहेत. सामान्य नागरिकदेखील यात उत्स्फूर्तपणे सहभागी होताना दिसून येत आहेत. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन एका दिवसावर येवून ठेपला आहे. त्यानिमित्त विविध जिल्ह्यांतील प्रशासकीय इमारतींवरही (Administrative buildings) आकर्षक रोषणाई पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील काही ठिकाणचा आढावा आम्ही घेतला आहे.

भोरमध्ये कवायती

पुण्यातल्या भोरमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर, जिजामाता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भारतवासीयांना आरोग्याचा संदेश देण्यासाठी, देशभक्तीपर आधारित गीतांवर कवायत प्रकार सादर केले. भोरमधल्या ऐतिहासिक राजवाडा चौकातील प्रांतधिकारी कार्यालयासामोर या कवायती सादर केल्या गेल्या. यावेळी प्रांतधिकारी राजेंद्र कचरे यांच्यासह तालुक्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

तळेगाव दाभाडेच्या रक्षा सामाजिक विकास मंडळाची सायकल मोहीम

तळेगाव दाभाडेच्या रक्षा सामाजिक विकास मंडळाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून त्यांच्या मंडळातील सदस्यांनी श्रीनगर ते लेह लडाख सायकल चालवून मोहीम फत्ते केली आहे. या मार्गादरम्यान येणाऱ्या विविध शाळेतील विद्यार्थ्यांना रक्षा सामाजिक विकास मंडळाच्या सदस्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले.

हे सुद्धा वाचा

जीव वाचवण्याचे प्रशिक्षण

या टीमने अतिउंच प्रदेशात एकून 445 किलोमीटर सायकल चालवली आहे. श्रीनगर आणि लेह या मार्गावर असलेल्या शाळेतील 250 विद्यार्थी, 30 शिक्षकांना ढगफुटी, भूकंप, बर्फाचा कडा कोसळणे अशा घटनांमध्ये स्वतः चा जीव कसा वाचवायचा याचे प्रशिक्षण दिले.

भिगवण पोलिसांतर्फे ‘हर घर तिरंगा’

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलिसांनी हर घर तिरंगा या देशाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या महोत्सवानिमित्त भिगवण पोलीस स्टेशनचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातून तिरंगा ध्वज घेऊन पदयात्रा काढून संचालन केले.

दौंड तालुक्यात प्रभातफेरी

दौंड तालुक्यातील राहू आणि पिंपळगावला देशाच्या स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा जनजागृतीसाठी गावात प्रभातफेरी काढण्यात आली. यामध्ये ग्रामपंचायतीसह गावच्या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग घेतला. येथील शाळेतील मुलांनी ढोल, झांज ताश्याच्या वाद्यात, लेझीम खेळासह, विद्यार्थ्यांनी हातात झेंडा घेत, हर घर तिरंगा, वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा दिल्या.

उजनीची रोषणाई

उजनी धरणावरील सोळा दरवाज्यावर तिरंग्याची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विद्युत रोषणाईमुळे सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी मनमोहक असे दृश्य पाहायला मिळत आहे. ड्रोनच्या माध्यमातून उजनी धरणावरील विद्युत रोषणाईची दृस्य टीव्ही 9वर पाहायला मिळतील.

पिंपरी चिंचवडमध्ये लेझर शो

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीन चिंचवडमथील बर्ड व्हॅली उद्यानात तिरंग्याच्या रंगात आणि देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून लेजर शो आयोजित करण्यात येत आहे. हा लेझर शो पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत आहेत. हा लेजर शो रात्री साडेसात ते आठ या वेळेत होत आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.