Vasant More : ‘रुपेशला आलेल्या धमकीनंतर मी आणि माझे कुटुंबीय व्यथित’; समोर येवून बोलण्याचं वसंत मोरेंचं आवाहन

आपण राजकारणात असल्यामुळे कुटुंबीयांना त्रास होत आहे. मात्र ज्याने कोणी हे केले असेल त्याने समोर यावे. काही चुका झाल्या असतील तर बोलू. पण उगाचच काहीतरी वेगळे करायचे, मला आणि माझ्या कुटुंबाला डिस्टर्ब करायचे, अशा गोष्टी करून काहीच साध्य होणार नाही, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे.

Vasant More : 'रुपेशला आलेल्या धमकीनंतर मी आणि माझे कुटुंबीय व्यथित'; समोर येवून बोलण्याचं वसंत मोरेंचं आवाहन
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 12:48 PM

पुणे : रुपेशला आलेल्या धमकीनंतर मी आणि माझे कुटुंबीय व्यथित झालो आहोत, अशी प्रतिक्रिया मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी दिली आहे. मनसे नेते वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश याला अज्ञात व्यक्तीने धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला. यानंतर वसंत मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidhyapeeth Police Station) तक्रार दिली. ही धमकी नेमकी कोणी आणि कोणत्या कारणाने दिली याचा उलगडा अद्याप झालेला नाही, याविषयी ते बोलत होते. ते म्हणाले, की यापूर्वी मला अगदी वेपन (Weapon) दाखवून धमकवण्याचे प्रकार झाले आहेत. पण माझ्या घरापर्यंत कधी हा प्रकार आला नव्हता. यासर्व प्रकारानंतर आम्ही डिस्टर्ब झालो आहोत, असे ते म्हणाले. याप्रकरणी कोणावर संशय नाही, मात्र पोलिसांत तक्रार दिली आहे, अशी माहिती वसंत मोरे यांनी दिली.

vasant more 3

मुलगा रुपेशसह वसंत मोरे

थोरवे शाळेजवळ घडला प्रकार

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार मेळावा ज्याठिकाणी घेतला त्या थोरवे शाळेजवळ हा प्रकार घडला. सकाळी लावलेली गाडी संध्याकाळी सहावाजता तेथील काम उरकल्यानंतर तो परतला होता. दोघेही आम्ही सोबतच होतो. तो त्याच्या मित्रांबरोबर मोरेबागला गेला आणि मी कात्रजला आलो. नंतर पंधरा-वीस मिनिटांनी त्याचा फोन आला, की मला बोलायचे आहे, प्रॉब्लेम झाला आहे. मग त्याला विचारल्यावर त्याने चिठ्ठीसंबंधी सांगितले. व्हाट्सअॅपवर त्याचा फोटो पाठवला. सावध राहा रुपेश असे त्यात लिहिले होते. ही चिठ्ठी गाडीच्या वायपरला लावली होती, असे वसंत मोरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत तपास

आपण राजकारणात असल्यामुळे कुटुंबीयांना त्रास होत आहे. मात्र ज्याने कोणी हे केले असेल त्याने समोर यावे. काही चुका झाल्या असतील तर बोलू. पण उगाचच काहीतरी वेगळे करायचे, मला आणि माझ्या कुटुंबाला डिस्टर्ब करायचे, अशा गोष्टी करून काहीच साध्य होणार नाही, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे. दरम्यान, याविषयी त्यांनी काल फेसबुक पोस्टही केली होती. भारती विद्यापीठ पोलीस आता याप्रकरणी तपास करत आहेत, असे त्यात ते म्हणाले होते.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.