Vasant More : 6 हजार शिल्लक होते, वसंत मोरेंनी फक्त एक फेसबुक पोस्ट केली! 6000चे 5 लाख झाले

पुणे : मनसेमध्ये पुण्यात राज ठाकरेंनंतर (Raj Thackeray News) सर्वाधिक चर्चेत असणारं नाव कोणतं असेल तर ते वसंत मोरे (Vasant More News). या वसंत मोरे यांच्या एका फेसबुक पोस्टने (Vasant More Facebook Post) 6 हजाराचे पाच लाख केलेत. याबाबत त्यांनी फेसबुकवर खुद्द स्वतःच माहिती दिली आहे. ज्या माणसाच्या खात्यामध्ये अवघे सहा हजार रुपये शिल्लक होते. […]

Vasant More : 6 हजार शिल्लक होते, वसंत मोरेंनी फक्त एक फेसबुक पोस्ट केली! 6000चे 5 लाख झाले
वसंत मोरेंची फेसबुक पोस्टImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 2:13 PM

पुणे : मनसेमध्ये पुण्यात राज ठाकरेंनंतर (Raj Thackeray News) सर्वाधिक चर्चेत असणारं नाव कोणतं असेल तर ते वसंत मोरे (Vasant More News). या वसंत मोरे यांच्या एका फेसबुक पोस्टने (Vasant More Facebook Post) 6 हजाराचे पाच लाख केलेत. याबाबत त्यांनी फेसबुकवर खुद्द स्वतःच माहिती दिली आहे. ज्या माणसाच्या खात्यामध्ये अवघे सहा हजार रुपये शिल्लक होते. त्या माणसाला वसंत मोरे यांच्या एका फेसबुक पोस्टने मदतीचा हात दिला. वसंत मोरे यांनी फेसबुकवरुन मदतीचं आवाहन केलं. त्यानंतर हजारो लोकांनी खारीचा वाटा उचलत, या माणसाला मदत मदत केली. शंभर, दोनशे, तीनशे, पाचशे, हजार असं करत करत या माणसाच्या खात्यामध्ये तब्बल पाच लाख रुपये रक्कम एका दिवसात जमा झाली आहे. ही सगळी किमया एका फेसबुक पोस्टमुळे शक्य झालीये. ही फेसबुक पोस्ट मंगळवारी रात्री उशिरा वसंत मोरे यांनी केली होती. मंगळवारी फेसबुक पोस्ट करत त्यांनी मदतीचं आवाहन केलं होतं. त्यानंतर बुधवारी रात्री उशिरा पोस्ट करत लोकांनी सढळ हातानं मदत केल्याबद्दल आभारही मानलेत.

नेमकी कुणाला मदत?

महाराष्ट्राचा खली अशी ओळख असलेल्या उमेश वसवे यांना आर्थिक मदतीची गरज होती. यासाठी वसंत मोरे यांनी फेसबुकवरुन मदतीचं आवाहन केलं होतं. त्यांच्या या आवाहनाला लोकांनीही भरभरुन दाद दिली होती. अनेकांनी पुढे येत वसंत मोरेंच्या आवाहनला सकारात्मक प्रतिसाद देत उमेश वसवे यांना सढळ हातानं मदत केलीये.

पाहा वसंत मोरेंनी नेमकं आवाहन काय केलं होतं?

हे सुद्धा वाचा

दरम्यान बुधवारी रात्री उशिरा महाराष्ट्रा खली उमेश वसवे यांच्या अकाऊंटमध्ये तब्बल पाच लाख रुपये इतकी रक्कम जमा झाली होती. ज्या माणसाच्या बँक खात्यात फक्त सहा हजार रुपये होते, त्याच्या अकाऊंटमध्ये एका फेसबुक पोस्टमुळे थेट पाच लाख रुपये इतकी रक्कम जमा झालीय. ही मदत देणाऱ्यांचे वसंत मोरे यांनी आभारही मानलेत.

वाचा वसंत मोरे यांनी नेमकं काय म्हटलं?

काल संध्याकाळी 11:00 वाजेपर्यंत उमेश वसवे ( महाराष्ट्राचा खली) याच्या बँक अकाउंट मधे फक्त 6 हजार रू. होते. काल मी तुम्हा सर्वांसमोर फेसबुक पोस्ट टाकुन मदत मागितली आणि तुम्ही सर्वांनी त्याच्या बँक अकाऊंट मधे भरभरून दिले… आज आता रोतोरात हा आपला खली लखपती झाला 5 लाख 35 हजार 534 रुपयांचे भरगोस दान त्याच्या झोळीत टाकले… तुम्हा सर्वांना शतशः धन्यवाद… आई जगदंबे खली ला लवकर बरे कर…

कोण आहेत वसंत मोरे?

वसंत मोरे हे पुण्यातील मनसेचे नगरसेवक असून भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे ते चर्चेत आले होते. त्यानंतर त्यांची मनसे शहराध्यक्ष पदावरुन उचलबांगडीही करण्यात आलेली. दरम्यान, त्यानंतर वसंत मोरे मनसे सोडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. अशातच काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांचे खंदे समर्थक निलेश माझिरे यांनी मनसे सोडल्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं होतं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.