Rupali Patil |वसंत मोरेंनी यापुढे वायफळ बडबड करु नये, नाहीतर मीही त्याच पद्धतीने उत्तर देईल – रुपाली पाटील
मला असं वाटतंय की वसंत भाऊ वायफळ बडबड करत आहे. आम्ही एकत्रित काम केल आहे, अगदी बहीण भावंडाप्रमाणे , त्यामुळे वसंतभाऊबदल बोलताना मी शांत आहे. पण एका मर्यादेपर्यंतच मी शांत राहू शकते. मला त्यांनी बोलायला भाग पाडू नये
पुणे- महाराष्ट्र नव निर्माण सेनेला रामराम ठोकत रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. मात्र त्यांच्या या प्रवेशावर मनसे नगरसेवक वंसत मोरे यांनी टीका केली आहे. त्यांच्या या टीकेचा रुपाली पाटील यांनीही चांगलाच समाचार घेतला आहे. ‘वसंत मोरेंनी यापुढे वायफळ बडबड करु नये, नाहीतर मीही त्याच पद्धतीने उत्तर देईल, अस चोख प्रत्त्युत्तर मनसेतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या रुपाली पाटील यांनी दिल आहे. मनसेतील काही रिकामटेकड्या नेत्यांमुळे पक्ष सोडत असल्याचं सांगून रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापूर्वी रुपाली पाटील यांनीमनसेच्या सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठवले होते. त्यावेळी त्यांनी तुम्हाला पाहून राजकारणात आले. तुम्ही कायम ह्रदयात होता आणि राहाल अशी भावनिक सादही घातली होती.
वसंत मोरेंनी काय केली होती टीका रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर रुपालीचा पाटीलचा राष्ट्रवादीतिल प्रवेश हा प्री प्लॅन होता.आता केवळ पक्षातील नेत्यांकडून त्रास होतोय म्हणून पक्ष बदला हे म्हणणे हास्यस्पद आहे. पक्षातील रिकामटेकडे नेते असे पाटील म्हणाल्या त्यांनी दाखवून द्यावे , कोण रिकामटेकडे आहेत ते ? तसेच राजीनामा देऊन त्यांनी राजकीय आत्महत्या केल्याची टीका ही वसंत मोरे यांनी केली होती.
मला बोलायला भाग पाडू नये मात्र हे कुठल्या प्रकारचं प्री प्लॅनिंग नव्हत. पक्षात कोणत्याही प्रकारचे बदल होत नव्हते हे बघून मी स्वतः बदलायचे ठरवेल आणि तसं घडत गेलं. मला असं वाटतंय की वसंत भाऊ वायफळ बडबड करत आहे. आम्ही एकत्रित काम केल आहे, अगदी बहीण भावंडाप्रमाणे , त्यामुळे वसंतभाऊबदल बोलताना मी शांत आहे. पण एका मर्यादेपर्यंतच मी शांत राहू शकते. मला त्यांनी बोलायला भाग पाडू नये, चोख प्रतिउत्तर रुपाली पाटील यांनी दिले आहे. सगळी परिस्थती त्याला माहिती आहे. मी तीच समोरासमोर , कुणालाही न घाबरता स्पष्ट पणे बोलणारी रुपाली पाटील असल्याचेही त्या म्हणाल्या. त्याबरोबरच राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अजित पवार जी काही जबाबदारी देतील ती प्रामाणिकपणे पार पाडेल अशीमाहिती त्यांनी दिली आहे.
Omicron: जालन्यात विदेशातून आलेले 16 जण नॉट रिचेबल, प्रशासन चिंतेत! MSRTC Strike: 20 डिसेंबरपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा नाही?; अनिल परब नेमकं काय म्हणाले?