मनसेच्या शहर कार्यालयात का जावसं वाटत नाही, वसंत मोरे यांनी सांगितलं कारण
शहरातील कुठल्याही शाखाध्यक्षाच्या घरी चला. मी यायला तयार आहे.
पुणे : मनसेचे नेते वसंत मोरे म्हणाले, मी मिटिंगसाठी स्मशानात येईन. पण, मनसेच्या पुणे शहर कार्यालयात मिटिंगसाठी येणार नाही. मात्र, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आदेश दिल्यास मी शहर कार्यालयातही जाईन, असं वसंत मोरे यांनी सांगितलं. मी आणि इतर मनसे पदाधिकाऱ्यांना वेगवेगळं मिटिंगला बोलावण्यात आलं. जिथं फूल वेचली, तिथं काटे वेचायला जाणार नाही, असं माझं पहिल्यापासूनचं मत असल्याचं ते म्हणाले.
तिथं गेल्यानंतर गुलाल मनपा ताब्यात घेतल्यानंतर उधळला जाणार होता. पण, वसंत मोरे यांचं पद काढल्यानंतर तिथं गुलाल उधळला गेला. पुणे शहरात २५ नगरसेवक निवडून आल्यानंतर मला तिथं पेढे वाटता येतील, असं वाटलं. पण, वसंत मोरे यांचं पद काढल्यानंतर पेढे वाटले गेले. यामुळं मला मनसेच्या शहर कार्यालयात जावसं वाटत नसल्यास वसंत मोरे यांनी सांगितलं.
दुसरी बाजू ऐकूण घेण्यासाठी मला बोलावण्यात आली. माझी अमित ठाकरे यांच्यासोबत पहिली भेट आहे. शहर कोअर कमिटीच्या बैठका या आधी बाहेर व्हायच्या. मग आता शहर कार्यालयातच मिटिंग व्हावी, असा अट्टाहास का, असा प्रश्न वसंत मोरे यांनी विचारला.
शहरातील कुठल्याही शाखाध्यक्षाच्या घरी चला. मी यायला तयार आहे. एखाद्या पदाधिकाऱ्याच्या घरी जाऊन मिटिंग घेऊ. शहर कार्यालय सोडून कुठही मिटिंगला येण्यास तयार असल्याचंही वसंत मोरे यांनी सांगितलं. त्या कार्यालयात वसंत मोरे यांच्या विरोधात कटकारस्थान झालीत. त्या कार्यालयात मला जावसं वाटत नसल्याचंही वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं.