Pune rain : पावसाची वाट पाहणाऱ्या पुणेकरांचा हिरमोड; पुढचे दोन दिवस हलक्याच सरी कोसळणार!
पुण्यालगतच्या काही भागांत मात्र पाऊस पडण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. परंतु पुढील काही दिवस शहरातील परिस्थिती कमी-अधिक राहण्याची शक्यता आहे. तरीही हलक्या सरीदेखील पडू शकतात, असे हवामान खात्याने स्पष्ट केले.
पुणे : पावसाची वाट पाहणाऱ्या पुणेकरांचा काहीसा हिरमोड झाला आहे. 19 जूनपर्यंत शहरात अति हलका ते हलका पाऊस पडण्याची (Very light to light) शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने बुधवारी वर्तवला आहे. जूनमध्ये आतापर्यंत, पुण्यात 15 जूनपर्यंतच्या हंगामात केवळ 28 मिमी पाऊस झाला आहे तर राज्याच्या काही भागांमध्ये मान्सून मंदावला आहे. जरी आयएमडीने आधीच शहरात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला होता, परंतु गेल्या काही दिवसांपासून शहरातील बहुतेक ठिकाणी नोंदवलेले पावसाचे प्रमाण शून्यावर आले आहे. आयएमडीच्या (IMD) एका अधिकाऱ्याने सांगितले, की पुढील काही दिवस, किमान 19 जूनपर्यंत, शहरात फक्त हलका पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. कारण सध्या पुण्यात पावसाला (Pune rain) मदत करणारे असे कोणतेही अनुकूल वातावरण नाही.
हलक्या सरी पडणार
पुण्यालगतच्या काही भागांत मात्र पाऊस पडण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. परंतु पुढील काही दिवस शहरातील परिस्थिती कमी-अधिक राहण्याची शक्यता आहे. तरीही हलक्या सरीदेखील पडू शकतात, असे हवामान खात्याने स्पष्ट केले. पुणे हे पश्चिम घाटाच्या वळणाच्या बाजूला आहे आणि त्यामुळे साधारणपणे कमी पाऊस पडतो, कारण अरबी समुद्रातून येणारे बहुतेक पाऊस वाहणारे वारे मुंबईसारख्या ठिकाणांना जास्त पाऊस देतात. तसेच ठाणे, जे वार्याच्या दिशेने किंवा पश्चिम घाटाच्या पश्चिम भागात आहेत, अशाच ठिकाणी पाऊस चांगला होतो, असे वेधशाळेने म्हटले आहे.
मुंबईच्या पावसात थोडी घट
खासगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेट वेदर सर्व्हिसेसनुसार, सध्या मुंबईतही पाऊस खालच्या बाजूला आहे. त्यांच्या एका रिपोर्टमध्ये सांगितले आहे, की 11 जून रोजी मान्सून सुरू झाल्यानंतर आणि तीन दिवसांपासून काही प्रमाणात हलका पाऊस पडल्यानंतर, या क्षणी मुंबईत पावसात थोडीशी घट झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून, मुंबईत पावसाचा जोर कमी आहे आणि 17 जूनपर्यंत अशीच परिस्थिती राहील, तोपर्यंत किनारपट्टीच्या शहरात पाऊस हलका असेल. बुधवारच्या IMDच्या निरीक्षण स्थानकांनुसार बहुतांश स्थानकांवर शून्य पाऊस पडला, तर इतर ठिकाणी कमी पाऊस झाला.