Raghunath Kuchik Case : चित्रा वाघ यांच्यावर पीडित तरुणी ठोकणार अब्रुनुकसानीचा दावा, कुचिक यांनाही दिला रविवारपर्यंतचा अल्टिमेटम
शिवसेना (Shivsena) उपनेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडित तरुणीने आज पुन्हा एकदा रघुनाथ कुचिक यांच्यावर आरोप करत त्यांना रविवारपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे.
पुणे : शिवसेना (Shivsena) उपनेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडित तरुणीने आज पुन्हा एकदा रघुनाथ कुचिक यांच्यावर आरोप करत त्यांना रविवारपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. रविवारपर्यंत मी कुचिक यांच्या प्रतिसादाची वाट बघणार आहे. त्यांनतर केस मागे घेण्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचे पीडित तरुणीने म्हटले आहे. यावेळी पीडित तरुणीने भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्याविरोधात लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही, तर वाघ यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचेही तिने म्हटले आहे. चित्रा वाघ यांनी आपल्याला खोटे बोलायला भाग पाडले. आपल्याला गोव्यात तसंच मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीने डांबून ठेवले. पोलिसांना विशिष्ट जबाब देण्यास वाघ यांनीच सांगितल्याचा गंभीर आरोप पीडित तरुणीने केला होता.
काय म्हणाली पीडित तरुणी?
मदत म्हणजे चित्रा वाघ यांना माझे काहीही पडलेले नाही. त्यांचा जो काही रोख आहे तो रघुनाथ कुचिक यांच्यावर आहे. त्यामुळे त्या माझ्याकडून अगदी तक्रारीपासून सगळ्या गोष्टी म्हणजे रघुनाथ कुचिक यांचा पीआरओ रोहित पिसे म्हणून आहे. तो सगळी माहिती म्हणजे ते कुठे राहतात, त्यांची फॅमिली काय? आनंद घरत म्हणून असाही एक व्यक्ती आहे. हे सगळे मिळून त्यांची सगळी माहिती ते अंकल आणि चित्रा वाघ यांना पाठवतात. त्यातून मग पुढील सगळ्या गोष्टी घडत गेल्या, असे पीडित तरुणी म्हणाली.
चित्रा वाघांनी खोडून काढले होते आरोप
फेब्रुवारीपासून एकटी लढणाऱ्या पीडितेसोबत उभे राहीले, तेव्हा कुणी तिच्या मदतीला नव्हतं. आज मात्र माझ्या विरोधात सगळे एकत्र याचा आनंद वाटला. मी सगळ्या चौकशींसाठी तयार आहे’, असे ट्वीट करत चित्रा वाघ यांनी आपली बाजू मांडली होती. तसेच या प्रकरणातील चौकशीला सामोरे जायला तयार असल्याचे म्हटले होते.