पुणे- मनसेचे नेते वसंत मोरे (MNS Vasant More) मनसेचे डँशिंग नेते म्हणून ओळखले जातात. राज ठाकरे यांच्या मशिदीविरोधात भूमिका घेतल्याने मागील काही दिवसांपासून ते अधिक चर्चेत आले आहेत. या भूमिकेमुळे मनसेत झालेले नाराजी नाट्य, त्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray)यांची भेट घेत त्यांनी आपली भूमिकाही स्पष्ट केली. मात्र त्यानंतर ते सातत्याने आपली नाराजी बोलून दाखवतायेत. सध्या सोशल मीडीयावर नितेश राणे (Nitesh Rane)आणि वसंत मोरे यांच्या भेटीची व्हीडीओ आणि फोटो व्हायरल होतोय. ही भेट नेमकी कधीची आहे यावरून सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. या व्हीडीओत दिसणारे एक भाजपचे आक्रमक नेते आणि दूसरे मनसेचे डँशिंग नेते वसंत मोरे आहेत. या दोघांच्या भेटीचा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. वसंत मोरेंच शहराध्यक्ष पद गेल्यानंतर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांसह अनेकांनी वसंत मोरेंना ऑफर दिली, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही वसंत मोरेंना फोन केला होता. मात्र त्यांनी मनसे सोडणं पसंत केलं नाही . शहराध्यक्षपदाच्या नवीन निवडीनंतर वसंत मोरेंनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि मी मनसेतचं राहणार असं स्पष्ट केलं मात्र मनसेत राहूनही ते सातत्याने आपली नाराजी बोलून दाखवतायेत. आणि त्यातचं सोशल मीडीयावर नितेश राणे आणि वसंत मोरे यांच्या भेटीचा फोटो व्हायरल होत असल्यानं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय.
नितेश राणे आणि वसंत मोरे यांच्या भेटीचा व्हीडीओ हा साधारण दोन वर्षापूर्वीचा आहे. पुण्यातील एका हॉटेलमध्ये वसंत मोरे गेले असता नितेश राणेंची भेट झाली तेव्हा नितेश राणेंनी मी तुमचे फेसबुकवर व्हीडीओ पाहतो अशी प्रतिक्रिया दिली होती आणि ती पोस्टही करण्यात आली होती..मात्र वसंत मोरेंच्या नाराजीनंतर वसंत मोरे पक्ष सोडणार का? या प्रश्नावर.वसंत मोरे अजूनही मी राजमार्गावरचं आहे असं सांगत आहेत.
वसंत मोरेंच्या नाराजीला सुरुवात झाली ती राज ठाकरेंनी घेतलेल्या भोग्यांच्या मुद्द्यावरील भूमिकेवरील मला कोणती भूमिका घ्यावी हेच कळत नाही असं वसंत मोरेंनी सांगितलं आणि चार दिवसात वसंत मोरेंना शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं. आणि साईनाथ बाबर यांच्याकडे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली..राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमीकेनंतर राज ठाकरेंच्या हस्ते हनुमानाच्या आरतीचं नियोजन करण्यात आलं होतं..मात्र याला वसंत मोरेंना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं तेव्हा ही वसंत मोरे नाराज असल्याची माहिती समोर आल्यानंतर राज ठाकरेंच्या आरतीला वसंत मोरेंनी हजेरी लावली. त्यानंतर वसंत मोरेंनीही आरतीचं आयोजन केलं होतं मात्र त्या आरतीला मनसेच्या स्थानिक नेत्यांनीही पाठ फिरवली. रविवारी पुण्यात मनसेचा मेळावा झाला मात्र कोअर कमीटीमधूनचं मोरेंना वगळण्यात आलं शहरातील स्थानिक नेते जाणूनबुजून करतायेत असा आरोपही त्यांनी केला मात्र वसंत मोरेंच्या नाराजीची दखल घेताना कोणीच पाहायला मिळत नाही.
राजकारणात पदावरून डावलल्यानंतर किंवा आपण घेतलेल्या भूमीकेनं जर पक्षाची भूमिका बदलत असेल तर नेत्यांवर कारवाई होणं होणं हे काय राजकारणात नवीन नाही ..या आधीही सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असेलेले एकनाथ खडसे जेव्हा भाजपात होते आणि आरोपांवरून ज्यावेळी त्यांना डावलण्यात आलं तेव्हा सातत्याने त्यांनी उघड व्यासपीठावरून आपली नाराजी बोलून दाखवली मात्र कालांतराने त्यांच्या नाराजीची दखल पक्षानं घेतली नाही आणि त्यांनी भाजपा सोडणं पसंत केलं तसं वसंत मोरे सातत्याने आपली नाराजी बोलून दाखवतायेत खरं मात्र कालांतराने त्यातली हवा निघून गेली आणि जर पक्षानं दखल घेतली नाही तर.मग मात्र वसंत मोरेंचा एकनाथ खडसे होऊ नये म्हणजे झालं!