…त्यांच्या श्रमदानाचे पाणवठ्यात उमटले प्रतिबिंब,सुपे येथील विद्या प्रतिष्ठानच्या शिक्षकांचं कष्ट, वन्यप्राणी, झाडांसाठी पाण्याची सोय

ऑनलाईन वर्ग संपल्यानंतर मिळणाऱ्या वेळेतून या शिक्षकांनी श्रमदानातून तब्बल 6000 लीटर क्षमतेचा पाणवठा तयार केला. School Teachers prepare water tank

...त्यांच्या श्रमदानाचे पाणवठ्यात उमटले प्रतिबिंब,सुपे येथील विद्या प्रतिष्ठानच्या शिक्षकांचं कष्ट, वन्यप्राणी, झाडांसाठी पाण्याची सोय
Follow us
| Updated on: Jan 03, 2021 | 2:56 PM

पुणे : कोरोनाची धास्ती अद्यापही कमी झालेली नाही, त्यामुळे बहुतांश शाळांमध्ये आजही ऑनलाईन शिक्षण दिलं जातंय. हीच बाब बारामती तालुक्यातल्या सुपे येथील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलच्या शिक्षकांनी लक्षात घेतली. ऑनलाईन शिकवण्याचं काम झाल्यानंतर शिक्षकांनी फावला वेळ सत्कारणी लावलाय. ऑनलाईन वर्ग संपल्यानंतर मिळणाऱ्या वेळेतून या शिक्षकांनी श्रमदानातून तब्बल सहा हजार लीटर क्षमतेचा पाणवठा तयार केलाय. त्यामुळं जवळ असलेल्या मयुरेश्वर अभयारण्यातील वन्यप्राण्यांची पाण्यासाठीची भटकंती थांबणार आहे. ( Vidya Pratishtan English Medium School Teachers prepare water tank for wild animals)

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच शाळा ऑनलाईन शिक्षण देत आहेत. बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलमध्येही ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. यानंतर मिळणाऱ्या वेळेत काहीतरी सामाजिक काम करावं असं, सर्व शिक्षकांनी ठरवलं. छप्पन मेरू मंदिर परिसरात ६ हजार लीटर क्षमतेचा पाणवठा श्रमदानातून तयार करण्यात आला. फावल्या वेळेचा सदुपयोग होवून भोवतालच्या वन्य प्राण्यांची पाण्याची सोय व्हावी, या उद्देशानं हा पाणवठा तयार केल्याचं प्राचार्य योगेश पाटील यांनी सांगितले. शिक्षणाबद्दल सामाजिक आणि पर्यावरणीय बांधिलकी जपली पाहिजे, या भूमिकेतून पाणवठ्याचा उपक्रम  राबवण्यात आला. वन विभागाला शाळांनी अशा प्रकारचं सहकार्य करण्याचं आवाहन योगेश पाटील यांनी केले आहे.

सामाजिक बांधिलकीतून उपक्रम

कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण देत असताना मिळणाऱ्या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्व शिक्षक एकत्र आलो. वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय होण्यासाठी पाणवठ्याची निर्मिती केली. विद्यार्थ्यांना सामाजिक कामांमधून प्रेरणा मिळावी आणि वन्यप्राण्यांना पाणी मिळावे यासाठी हा पाणवठा तयार करण्यात आला आहे. या श्रमदानात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह पालकांनीही उत्स्फूर्तपणे साथ दिल्याचं शिक्षक दादा राऊत सांगितले. तर, शिक्षिका वैशाली खेत्रे यांनी हे पाणवठ्याचं काम पूर्ण झाल्यामुळे समाधान मिळाल्याचं म्हटलंय.

शाळांमध्ये शैक्षणिक उपक्रमांचं आयोजन केलं जातं. त्यातून विद्यार्थ्यांना विविध बाबींचं मार्गदर्शन व्हावं हा हेतू असतो.मात्र, आता मिळालेल्या फावल्या वेळेतून वन्य प्राण्यांसाठी पाणवठा तयार करत सुपे येथील विद्या प्रतिष्ठान स्कूलच्या शिक्षकांनी एक वेगळा आदर्श निर्माण केलाय.

संबंधित बातम्या:

Nanded | रेशीम शेतीमुळे नांदेडमधील शेतकऱ्यांचे आयुष्य बदललं, वर्षाला लाखोंचा नफा

हरियाणा सरकारची मोठी घोषणा; ‘या’ नव्या योजनेमुळे शेतकऱ्यांना होणार फायदा

नववर्षाच्या मुहुर्तावर नांदेडच्या शेतकऱ्याची मेहनतीची वांगी फळाला, 40 दिवसांत 3 लाखांचा नफा!

(Vidya Pratishtan English Medium School Teachers prepare water tank for wild animals)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.