कुविख्यात गुंड गजानन मारणेने केलं चंद्रकांतदादांचं स्वागत, विजय वडेट्टीवार म्हणाले, हे तर लाडके…

Vijay Vadettiwar : कुख्यात गुंड गजानन मारणे यांने दहिहंडीच्या कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आणि त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मंत्री महोदयांनी पुष्पगुच्छ स्वीकारला, त्यावरुन आता काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी असा चिमटा काढला.

कुविख्यात गुंड गजानन मारणेने केलं चंद्रकांतदादांचं स्वागत, विजय वडेट्टीवार म्हणाले, हे तर लाडके...
विजय वडेट्टीवारांचा चंद्रकांत दादांवर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Aug 29, 2024 | 10:15 AM

कुख्यात गुंड गजानन मारणे यांनी दहिहंडीच्या पुण्यातील कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. त्याने यावेळी चंद्रकांत दादांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मंत्री महोदयांनी यावेळी पुष्पगुच्छ स्वीकारला. त्यावरुन आता काँग्रेसने भाजपवर जोरदार हल्ला चढवला. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आता या मुद्दावरुन मंत्रिमहोदयांवर चांगलेच तोंडसूख घेतले. त्यांनी भाजपला चिमटा काढला.

व्हिडिओ केला सोशल मीडियावर शेअर

हे सुद्धा वाचा

याप्रकरणात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील आणि गुंड गजानन मारणे यांच्यासंबंधीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात मारणे हा मंत्रिमहोदयांना पुष्पगुच्छ देताना दिसत आहे. एका दहिहंडी कार्यक्रमातील हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ वडेट्टीवार यांनी शेअर केला आहे.

विजय वडेट्टीवार यांचे ट्वीट काय

‘लाडके गुंड‘ या नावाने त्यांनी हे ट्वीट केले आहे. त्यानुसार, ‘कुख्यात आणि महायुती सरकारचा लाडका गुंड गजानन मारणे याने मंगळवारी झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मंत्री महोदयांनी देखील पुष्पगुच्छ स्वीकारून गजानन मारणेला हात जोडले.’ असे ट्वीट त्यांनी केले.

हा तर गुंडाला राजाश्रय

पुण्यातील कोथरूड भागात असलेला गजानन मारणे, त्याच कोथरुडमधील आमदार चंद्रकांत पाटील. लोकप्रतिनिधी हे जनतेसाठी असतात पण परत निवडून येण्यासाठी आजच्या परिस्थितीत महायुतीला लाडके गुंड महत्वाचे आहे म्हणून सत्कार चमत्कार गुंडाकडून घेतले जात आहे.या भागातील नागरिकांना अश्या गुंडपासून संरक्षण देणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी असताना मंत्री महोदय गुंडाला ‘राजाश्रय‘ देत आहे.

भाजपचे माजी मंत्री आणि विद्यमान खासदार यांनी आणि त्यांच्या मुलाने पोलिसांची इज्जत कशी काढली हे काल दिवसभर संपूर्ण महाराष्ट्राने live पाहिले. पोलिसांना धमकावण्याचा असा माज खासदार नारायण राणे आणि त्यांचा मुलगा निलेश राणे यांना कुठून आला हा प्रश्न जनतेला पडला होता. त्याचे उत्तर मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिले आहे. या राज्यात पोलिसांची इज्जत राहिली नाही. मंत्री गुंडांकडून सत्कार करून घेतात, आमदार पोलिसांना शिवीगाळ करतात, धमकावतात.

जिथे गुंडांना राजाश्रय मिळत आहे तिथे सामान्य जनतेने आपले रक्षण होईल या भाबड्या आशा ठेवू नये. गुंडांना डोक्यावर घेऊन मिरवणाऱ्या या सरकारला आता जनतेने पुष्पगुच्छ देऊन निरोप द्यावा हीच राज्यातील जनतेला विनंती, असे ट्वीट विजय वडेट्टीवार यांनी केले.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.