पुणे : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोणावळा येथील ओबीसी चिंतन बैठकीत शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावलाय. मंचावरील भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वाघ नाना पटोले यांच्याकडे पाठवा असं सांगितलं. त्यावर वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो, असं म्हणत त्यांनी शिवसेनेला अप्रत्यक्षपणे छोचक टोला लगावला (Vijay Wadettiwar comment on Shivsena indirectly over political control).
विजय वडेट्टीवार यांनी मी अशा भागातील राहतो जेथे भरपूर वाघ आहेत. त्यामुळे मी माझ्या खात्यात पैसे आले तर परत जाऊ देणार नाही, असं म्हटलं. यावर मंचावर बसलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वाघ नाना पटोले यांच्याकडेही पाठवा असं सांगितल्या. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी आम्ही वाघ पाठवू, पण तो वाघ आमच्याच इशाऱ्याने चालतो. कारण तो आमचा वाघ आहे, असं म्हणत अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला टोला लगावला. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
“कोरोना लाट गेली की ओबीसींचा पहिला विराट मोर्चा औरंगाबाद येथे होणार आहे,” अशीही घोषणा यावेळी विजय वडेट्टीवार यांनी घोषणा केली. तसेच जेवढे पैसे सारथी मिळतील, तेवढेच पैसे महाज्योतीला मिळतील. मी बसलोय इथे, असं म्हणत ओबीसींसाठीच्या निधीसाठी त्यांनी दंड थोपटले.
विजय वडेट्टीवार म्हणाले, “मी गोपीनाथ मुंडे यांचा शिष्य आहे. पंकजा मुंडे आणि मी गुरुबंधू आहे. ओबीसींवर अन्याय झालाय. तुम्ही आम्ही एकत्र आलो तर हा अन्याय दूर होईल. प्रस्थापितांच्या विरोधात लढणे सोपं नाही. बावनकुळे साहेब, माझा नेता ओबीसी आहे, त्यामुळे मला तिकीटाची भिती नाही. मी समाजासाठी झुकायला आणि वाकायला तयार आहे.
“मला रोज धमक्या येतात, त्या टोकाच्या येतात. धमक्या देणाऱ्यांनो, आम्ही तुमच्या विरोधात नाही आणि राहणारंही नाही. माझं काय होईल ते होईल, पण ओबीसींच्या मुद्यावर मी शांत बसणार नाही. आपलं अडले, तर सगळ्यांनाच बाप म्हणावं लागतं. फडणवीस साहेबांना घेऊन जाऊ. वेळ पडली तर पंतप्रधानांच्या पाया पडू. या आठवड्यात आयोगाला पत्रव्यवहार करु, त्यांना डाटा गोळा करायला हवं ते देऊ,” असंही त्यांनी नमूद केलं.
Vijay Wadettiwar comment on Shivsena indirectly over political control