Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“एक इंचही जमीन देणार नाही”, नव्या विमानतळाच्या चर्चेनंतर बारामती, पुरंदर तालुक्यातील शेतकरी आक्रमक

बारामती तसेच पुरंदर तालुक्यातील काही गावातील जागेवर नवे विमानतळ होणार असल्याची चर्चा सुरु झाल्यामुळे येथील गावकरी आक्रमक झाले आहेत.

एक इंचही जमीन देणार नाही, नव्या विमानतळाच्या चर्चेनंतर बारामती, पुरंदर तालुक्यातील शेतकरी आक्रमक
ग्रामस्थांनी आज बैठक घेतली.
Follow us
| Updated on: Jun 26, 2021 | 9:13 PM

पुणे : नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद अजूनही शांत झालेला नसताना आता पुणे जिल्ह्यातील बारामती आणि पुरंदर तालुक्यातील काही ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. बारामती तसेच पुरंदर तालुक्यातील काही गावातील जागेवर नवे विमानतळ होणार असल्याची चर्चा सुरु झाल्यामुळे येथील गावकरी आक्रमक झाले आहेत. काहीही झाले तरी गावाची एक इंचही जमीन आम्ही देणार नाही असा पवित्रा या गावकऱ्यांनी घेतला आहे. (villagers of Baramati and Purandar taluka become aggressive over airport establishment decided wont give land for airport)

पुरंदर, बारामती तालुक्यातील शेतकरी आक्रमक

मिळालेल्या माहितीनुसार पुरंदर तालुक्यातील रिसे, पिसे, राजुरी, नायगाव, पांडेश्वर तसेच बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी, चांदगुडेवाडी, आंबी खुर्द या गावांच्या परिसरात विमानतळ होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. विमानतळासाठी कोणत्याही परिस्थितीत आपल्या जमिनी द्यायच्या नाहीत ही या गावातील शेतकऱ्यांची ठाम भूमिका आहे.

एक इंचही जमीन न देण्याचा ठराव

यासाठी नायगाव येथे सर्व ग्रामस्थांची आज (26 जून) बैठक संपन्न झाली. यावेळी येथील शेतकऱ्यांनी आपल्या भागात विमानतळ होण्यास तीव्र विरोध दर्शविला. तसेच काहीही झाले तरी एक इंचही जमीन न देण्याचा ठराव गावबैठकीत करण्यात आला.

नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा वाद

नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Navi Mumbai airport) नामकरणावरुन राजकारण पेटलं आहे. स्थानिकांनी लोकनेते दि. बा. पाटील (D B Patil Navi Mumbai) यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. तर राज्य सरकारने शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवला आहे. तिकडे बंजारा समाजाने या विमानतळाला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक (Vasantaro Naik) यांचं नाव द्यावं अशी मागणी केली आहे.

तर सिडकोची संकल्पना ही माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची होती. त्यामुळे त्यांचे नाव विमानतळाला द्यावे अशी मागणी पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी केलीय. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वस्तूस्थिती मांडत, नवी मुंबईतील विमानतळ हे स्वतंत्र नसून, ते मुंबई विमानतळाचा (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport Mumbai) विस्तार आहे, त्यामुळे जे नाव मुंबई विमानतळाला आहे, तेच नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हेच नाव नवी मुंबई विमातळाला असेल, असं म्हटलंय. या अशा विविध मागण्यांमुळे नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

इतर बातम्या :

पालांडे आणि कुंदनला पाच दिवसांची कोठडी, अनिल देशमुखांवर ईडीच्या वकिलांचे गंभीर आरोप, दिवसभरात काय-काय घडलं?

WTC Final जिंकल्यानंतर न्यूझीलंडचे खेळाडू भिडले, दोघांमध्ये घमासान, काय घडलं?

(villagers of Baramati and Purandar taluka become aggressive over airport establishment decided wont give land for airport)

'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया.
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.