Wablewadi | वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजींचे निलंबन मागे; या कारणामुळे झाली होती कारवाई

दत्तात्रय वारे यांच्यावर 22 नोव्हेंबरला निलंबनाची कारवाई करण्यात आली होती पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं कामात आर्थिक अनियमितता ठेवल्याचा ठपका ठेवत निलंबित केले होते. या विरोधात त्यांनी न्यायालयात धाव घेत निलंबन मागे घेण्याची याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळत शिक्षक दत्तात्रय वारे यांचे निलंबित कारवाईत हस्तक्षेप करु शकत नाही असे म्हणत फटकारले होते

Wablewadi | वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजींचे निलंबन मागे; या कारणामुळे झाली होती कारवाई
Dattaray Ware -Wablewadi
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 4:20 PM

पुणे – पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी (Wablewadi)   येथील आंतराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या जिल्हा परिषद शाळेतील (Zilla Parishad School)शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजी (Guruji by Dattatraya)यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली आहे. मागील दोन महिन्यापूर्वी दत्तात्रय वारे गुरुजी यांना निलंबित करण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत वारे गुरुजींच्या निलंबनाची मागणी सदस्यांनी लावून धरली होती. एवढेच नाही तर चौकशी समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणीही सदस्यांनी केली होती.  त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे राजकीय आकसापोटी होते का, असा प्रश्नही जिल्हा परिषदेच्या वर्तुळात विचारला जात आहे.समितीच्या बैठकीत वारे गुरुजी यांच्यावरील आरोपांची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगत त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यावर वारे गुरुजी पुन्हा शाळेत रुजू होणार आहेत.

हे होते आरोप

आंतराष्ट्रीय स्तरावरप्रसिद्ध असलेल्या वाबळेवारी येथील जिल्हा परिषदेची शाळेत स्थानिक मुलांना प्रवेश दिले जात नाही. तसेच डोनेशन घेऊन इतर बाहेरील मुलांना प्रवेश दिला जातो असा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता. दुसरीकडे स्थानिक राजकारणातिला कुरघोडीतून वारे यांचे निलंबन करण्यात आल्याची चर्चाही स्थानिक पातळीवर रंगली होती. आंतराष्ट्रीय स्तरावरून मिळालेल्या निधी मध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोपही

होवू शकते कारवाई राज्यात आदर्श शाळा म्हणून नाव कमावलेल्या पुण्याच्या शिरुर तालुक्यातील वाबळेवाडी गावातील आदर्श शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांची न्यायालयाने निलंबनाची कारवाई मागे घेण्याची याचिका फेटाळली नंतर आता जिल्हा परिषदेच्या निलंबन आढाव बैठकीत त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. वारे गुरुजी यांचे निलंबन होऊन तीन महिने झाले आहेत त्यांची चौकशी संपली असून त्याचा अहवाल विभागीय कार्यालया कडे पाठविन्यात आला आहे त्यामुळे निलंबन झाल्यानंतर तीन महिन्यात निकाल लागला नाही तर निलंबन मागे घेण्यात येते त्यानुसार दत्तात्रय वारे यांच्या सह अन्य 20 जणांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. विभागीय कार्यालात ते दोषी आढळले तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल.

काय आहे वाबळेवाडीची शाळा शिरूर तालुक्यातील शिक्रापूरपासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेले 50 ते 60 घरांचे वाबळेवाडी छोटसे गाव आहे. या गावची लोकसंख्या चारशेच्या आसपास आहे. दोन गळक्या खोल्या, पडक्या भिंती अशी या गावची सात वर्षापूर्वीची शाळा होती. याच शाळेत मुले शिक्षणाचे धडे गिरवत होते. शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांनी ग्रामस्थ आणि मदतीने शाळेचा कायापालट केला होता. वाबळेवाडीच्या ज्या शाळेची आणि त्यासाठी दत्तात्रय वारे यांनी केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली.मात्र दत्तात्रय वारे यांच्यावर 22 नोव्हेंबरला निलंबनाची कारवाई करण्यात आली होती पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं कामात आर्थिक अनियमितता ठेवल्याचा ठपका ठेवत निलंबित केले होते. या विरोधात त्यांनी न्यायालयात धाव घेत निलंबन मागे घेण्याची याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळत शिक्षक दत्तात्रय वारे यांचे निलंबित कारवाईत हस्तक्षेप करु शकत नाही असे म्हणत फटकारले होते तसेचे चौकशी समिती समोर हजर राहण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश दिले असताना आता त्यांचे निलंबन मागे घेतल्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या निलंबन आढाव बैठकीत घेण्यात आला आहे.

JioPhone 5G मध्ये मिळणार स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, लॉन्चिंगआधी जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

CCTV | कोंबड्या नेणाऱ्या टेम्पोची बाईकला समोरासमोर धडक, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

New ITR filing: सुधारित आयकर विवरणपत्रासाठी किती रिकामा होईल खिसा?

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.