Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Puner Water Cut : पुणेकरांनो, उद्या ‘या’ भागात पाणीबाणी! अपरिहार्य कारणामुळे एक दिवस पाणीबाणीचं संकट

Pune News : कोथरुड, वारजे, पौड रोड, बाणेर, बालेवाडी, बावधन, पाषाण, सूस रोड, कर्वेनगर, कर्वे रोड, डेक्कन जीमखाना, औंध, बोपोडी हा आणि याच्या आजूबाजूच्या परिसरात एक दिवस पाणीबाणी जाणवणार आहे.

Puner Water Cut : पुणेकरांनो, उद्या 'या' भागात पाणीबाणी! अपरिहार्य कारणामुळे एक दिवस पाणीबाणीचं संकट
(प्रातिनिधिक छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 7:08 AM

पुणे : महाराष्ट्राच्या (Maharashtra News) बहुतांश भागात बऱ्यापैकी पाऊस झाला असून पाणी पुरवठा करणारी तलावही तुडुंब भरली आहेत. मात्र अशातच पुणेकरांना गुरुवारी म्हणजेच उद्या पाणीबाणीचा (Pune Water Cut) सामना करावा लागणार आहे. काही अपरिहार्य कारणामुळे पुणे शहरातील (Pune City News) महत्त्वाच्या भागात उद्या पाणी पुरवठ्यावर परिणाम जाणवरणार असून लोकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. गुरुवारी एक दिवस पाणीपरुवठा बंद राहिल. तर शुक्रवारी कमी दाबाने पाणी सोडण्यात येईल, असं पुणे पालिकेच्या वतीने सांगण्यात आलं आहे. त्यामुळे लोकांनी बुधवारीच पाण्याचं योग्य नियोजन करण्याची गरज व्यक्त केली जाते आहे. ऐनवेळी पाणी आलं नाही, म्हणून लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पुणे पालिकेच्या वतीन लोकांना खबरदारी घेण्याच्या सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. पम्पिंग आणि पॉवर सप्लायबाबत महत्त्वपूर्ण कामं करण्यासाठी पुणे शहरातील महत्त्वाच्या भागाच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम जाणवेल, अशी माहिती देण्यात आली आहे.

कोण कोणत्या भागात पाणी नाही?

टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पुणे शहरातील कोथरुड, वारजे, पौड रोड, बाणेर, बालेवाडी, बावधन, पाषाण, सूस रोड, कर्वेनगर, कर्वे रोड, डेक्कन जीमखाना, औंध, बोपोडी हा आणि याच्या आजूबाजूच्या परिसरात एक दिवस पाणीबाणी जाणवणार आहे. पुणे पालिकेनें तशी सूचनाही जारी करत लोकांना खबरदारी घेण्याचं, पाण्याचा अतिरीक्त साठा आधीच करुन घेण्याच नियोजन करण्याबाबतही आवाहन केलं आहे. तसं पाण्याता अपव्यय टाळून योग्य प्रमाणात पाणी जपून वापरावं, अशाही सूचना दिल्यात. गुरुवारी (25 ऑगस्ट) रोजी ही पाणीकपात केली जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

का पाणी कपात?

चांदणी चौक, गांधी भवन, एसएनडीटी, पर्वती, जुन्या आणि नव्या होळकर पम्पिंक आणि चतुश्रुंगी येथील ओव्हरहेड टँकचा विद्युत पुरवठा आणि पम्पिंगबाबत पाणीपुरवठा विभागाला काम करायचं आहे. त्या कारणासाठी एक दिवस पुण्यातील महत्त्वाच्या भागात पाणी पुरवठा बंद राहिलं, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.