पुणे : महाराष्ट्राच्या (Maharashtra News) बहुतांश भागात बऱ्यापैकी पाऊस झाला असून पाणी पुरवठा करणारी तलावही तुडुंब भरली आहेत. मात्र अशातच पुणेकरांना गुरुवारी म्हणजेच उद्या पाणीबाणीचा (Pune Water Cut) सामना करावा लागणार आहे. काही अपरिहार्य कारणामुळे पुणे शहरातील (Pune City News) महत्त्वाच्या भागात उद्या पाणी पुरवठ्यावर परिणाम जाणवरणार असून लोकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. गुरुवारी एक दिवस पाणीपरुवठा बंद राहिल. तर शुक्रवारी कमी दाबाने पाणी सोडण्यात येईल, असं पुणे पालिकेच्या वतीने सांगण्यात आलं आहे. त्यामुळे लोकांनी बुधवारीच पाण्याचं योग्य नियोजन करण्याची गरज व्यक्त केली जाते आहे. ऐनवेळी पाणी आलं नाही, म्हणून लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पुणे पालिकेच्या वतीन लोकांना खबरदारी घेण्याच्या सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. पम्पिंग आणि पॉवर सप्लायबाबत महत्त्वपूर्ण कामं करण्यासाठी पुणे शहरातील महत्त्वाच्या भागाच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम जाणवेल, अशी माहिती देण्यात आली आहे.
टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पुणे शहरातील कोथरुड, वारजे, पौड रोड, बाणेर, बालेवाडी, बावधन, पाषाण, सूस रोड, कर्वेनगर, कर्वे रोड, डेक्कन जीमखाना, औंध, बोपोडी हा आणि याच्या आजूबाजूच्या परिसरात एक दिवस पाणीबाणी जाणवणार आहे. पुणे पालिकेनें तशी सूचनाही जारी करत लोकांना खबरदारी घेण्याचं, पाण्याचा अतिरीक्त साठा आधीच करुन घेण्याच नियोजन करण्याबाबतही आवाहन केलं आहे. तसं पाण्याता अपव्यय टाळून योग्य प्रमाणात पाणी जपून वापरावं, अशाही सूचना दिल्यात. गुरुवारी (25 ऑगस्ट) रोजी ही पाणीकपात केली जाणार आहे.
चांदणी चौक, गांधी भवन, एसएनडीटी, पर्वती, जुन्या आणि नव्या होळकर पम्पिंक आणि चतुश्रुंगी येथील ओव्हरहेड टँकचा विद्युत पुरवठा आणि पम्पिंगबाबत पाणीपुरवठा विभागाला काम करायचं आहे. त्या कारणासाठी एक दिवस पुण्यातील महत्त्वाच्या भागात पाणी पुरवठा बंद राहिलं, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.