शिरूर – आमचं राज्यात सरकारला पाहीजे, परंतु केंद्रातल सरकार (central government)देखील सरकार हवंय , त्यासाठी पवारसाहेब देशातील सर्व पक्षातील नेत्याना एकत्र करण्याच काम करत आहेत. नव्याने काही मांडण्याचा व करण्याच प्रयत्न करत असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी शिरूरमध्ये बोलताना दिली आहे. गेली 50 वर्षे शरद पवार सातत्यानं कार्यरत आहे. आजही वयाच्या 80 पार केल्यानंतरही तो माणूस एकही दिवस थांबायला तयार नाही दररोज कुठेना कुठे तरी दौरा आहे. ऊन , वारा , पावसाची परवा न करता रात्रंदिवस पायाला भिंगरी बांधून फिरत असतो शरद पवार साहेब(Sharad Pawar ) सतत लोकांसाठी काहींना काही करण्याचा प्रयत्न करत आहेत.आज प्रकृती नसताना सगळं करत असताना काही लोक पवार साहेबावर विनाकारण काही संबध नसताना खालच्या भाषेत. टीका केली जाते. त्यावेळी त्याचे उत्तर द्यायला आमचे स्टेजवरील तसेच समोर बसलेले लोक पुढे का येत नाहीत असा खोचक सवाल गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विचारला आहे.
आज दिल्लीत बसलेल्या भाजप सरकारने आपल्याला2014 पासून आश्वासन दिली. त्या भाजपा सरकारला आश्वासन पूर्ण करत आली नाहीत अशी टीकाही दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे. देशाची अर्थव्यवस्था खाली गेली आहे, उद्योगधंदे खाली गेलेत, रोजगारांच्या संधी कमी झाल्यात,महागाई वाढत आहे. केंद्र सरकार एक एक प्रकल्प बाजारात विकायला लागलाय उत्पादनाच साधनच नाही विकायचं आणि मजा. करायचं ही भूमिका दिल्लीच्या सरकारची आहे म्हणून राज्यात तर आपलं सरकार पाहिजे आणि दिल्लीत ही आपल सरकार पाहिजे या साठी शरद पवार हे देशाचे नवीन राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे.
अभिनेत्री केतकी चितळेने केलेल्या आक्षेपार्ह पोस्टनंतर राज्यभरातून तिचा निषेध व्यक्त केला जात आहे. राज्यातील अनेक ठिकाणी केतकीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केतकीला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने तिला18 मे पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे. सामाजिक, राजकीय , सांस्कृतीक क्षेत्रातून तिच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.