प्रचंड गरम होतंय, पण पुढच्या चार दिवसात बदल होणार, तापमानात मोठी घट होणार, कारण…

महाराष्ट्रात उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देणारी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झालेली बघायला मिळाली. पण आता पुढच्या चार दिवसात तापमानात मोठी घट होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रचंड गरम होतंय, पण पुढच्या चार दिवसात बदल होणार, तापमानात मोठी घट होणार, कारण...
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 6:19 PM

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात उकाड्यामुळे नागरीक हैराण झाले आहेत. सूर्य अक्षरश: आग ओकतोय की काय, अशी परिस्थिती आहे. राज्यासह देशभरात तापमानात प्रचंड वाढ झालेली बघायला मिळतेय. विशेष म्हणजे तापमान वाढीमुळे अनेक नागरिकांना उष्माघाताचा त्रास होतोय. अनेकांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचं देखील समोर आलं आहे. नवी मुंबईच्या खारघर येथे आयोजित महाराष्ट्र भूषण पुरस्कारातील घटना ही ताजी आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 14 भाविकांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे उष्माघात किती भयंकर आहे याचे गांभीर्य पुन्हा एकदा जगासमोर आलं आहे. विशेष म्हणजे या रणरणत्या उन्हाळ्यातील एक दिलासादायक बातमी आता समोर आली आहे. राज्यातील नागरिकांची पुढच्या चार दिवसांसाठी तरी उकाड्यापासून सुटका होणार आहे.

राज्यातील नागरिकांची उकाड्यापासून होणार सुटका. उद्यापासून पुढच्या 4 दिवसात राज्यातील उष्णतेत मोठी घट होणार आहे. त्यामुळे उन्हाने हैराण झालेल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. संपूर्ण राज्यातील कमाल तापमानात उद्यापासून पुढील 4 दिवस घट होणार आहे. उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुढील चार दिवस राज्यभरातील तापमानात मोठी घट होणार असल्याची माहिती पुणे वेध शाळेचे प्रमुख डॉ. के एस होसाळीकर यांनी दिली आहे.

दुसऱ्या बाजूला, गेल्या काही दिवसात पुण्याचे तापमान 40 अंशाच्यावर जात आहे. पुण्यात एप्रिल किंवा मे महिन्यात 40 अंश तापमान बऱ्याचदा नोंदी झाल्या आहेत. 40 अंशापेक्षा जास्त तापमान गेल्यावर नागरिकांनी काळजी घ्यावी. दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत लोकांनी गरज नसेल तर बाहेर पडू नये, असे देखील आवाहन हवामान विभागाने केले आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यात सातत्याने नैसर्गिक संकट

राज्यातील नैसर्गिक वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. राज्यात एकीकडे उष्णतेची लाट आलीय. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना अक्षरश: गरम वाफ लागतेय की काय, इतक्या तीव्र उन्हाच्या झळा बसत आहेत. इतकं भयानक ऊन बघायला मिळतंय. उन्हामुळे तब्येत बिघडण्याची भीती आहे. त्यामुळे अनेकजण दुपारच्या वेळी घराबाहेर न पडणं पसंत करत आहेत. पण अनेकांना कामानिमित्त घराबाहेर पडावंच लागतं. याशिवाय घरातही उकाड्याने अनेक नागरीक हैराण झाले आहेत. तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अनेक भागांमधील पारा तर 40 अंश सेल्सिअसच्याही पार गेलेला बघायला मिळाला.

विशेष म्हणजे एकीकडे तापमानात वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे काही भागांमध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना हवालदिल केलं आहे. अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं आहे. शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीसाठी आशा आहे. सरकार आपल्याला उभं राहण्यासाठी तरी मदत देईल, अशी सरकारला आशा आहे. पण निसर्गाचं हे दृष्टचक्र कधी थांबणार? असा प्रश्न आहे.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.