Pune accident : वारजे पुलावर विचित्र अपघात, एकाच कुटुंबातले चौघे गंभीर

पुण्यातील वारजे (Warje) पुलावर चार वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात (Accident) एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी (Injured) झाले आहेत. या अपघातानंतर त्यांना माई मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीची नावे समजू शकलेली नाहीत.

Pune accident : वारजे पुलावर विचित्र अपघात, एकाच कुटुंबातले चौघे गंभीर
अपघातानंतर कारचा झालेला चेंदामेंदा
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 5:34 PM

पुणे : पुण्यातील वारजे (Warje) पुलावर चार वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात (Accident) एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी (Injured) झाले आहेत. सकाळी दहाच्या दरम्यान माई मंगेशकर रुग्णालयाच्या समोरील पुलावर एका गाडीचा अचानक कमी वेग झाला. त्यामुळे पुढील वॅगनार गाडीवर मागील ट्रक धडकला. पुढे टँकर असल्याने ही गाडी मध्येच चेंबली गेली. हा अपघात इतका विचित्र, भयंकर होता, की गाडीचा कोणताही भाग ओळखता येत नव्हता. या अपघातात वॅगनार गाडीचा चेंदामेंदा झाला. अपघातामध्ये एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन मुली गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर त्यांना माई मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीची नावे समजू शकलेली नाहीत. दरम्यान अपघातानंतर रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या.

वाहनांच्या लागल्या होत्या रांगा

दुसरीकडे आज सकाळच्या सुमारासच आज पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली होती. वाहतूक अत्यंत धिम्या गतीने सुरू होती. मुंबईवरून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. तर वाहनाची संख्या वाढल्याने अमृतांजन पुलाजवळ वाहनांची प्रचंड मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे आधीच उन्हाने बेजार झालेल्या नागरिकांना आणखी ताप झाला.

आणखी वाचा :

Express way Jam : एकीकडे वाहनांच्या रांगा दुसरीकडे घामाच्या धारा! सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी झाल्यानं मुंबई-पुणे महामार्गावर गर्दी

Pune fire : पुणे स्टेशनच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आग, स्टॉल्स जळून खाक

Pune Crime : इंद्रायणी नदीपात्रात अवैध वाळूउपसा; मुद्देमाल जप्त मात्र आरोपी पसार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.