आत्मनिर्भरची सुरुवात कुठून झाली? सुप्रिया सुळे यांनी सांगितलं…
रागीचं बिस्टीक, सोलापूरची कडक भाकर, हातसळीचा तांदुळ, बचतगटानं बनविलेले मसाले यांना ऑर्गनिक म्हणतात.
बारामती : बारामतीची आण, बाण, शान. महाराष्ट्राचं राजकारण नाही तर समाजकारण आणि क्रीडामध्ये महाराष्ट्रात आणि देशात पुढं नेऊ, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या, जुन्या लोकांनी त्या काळात सामाजिक परिवर्तन केलं. बारामती केवळ राजकारणात न राहता क्रीडा आणि समाजकारणातही पुढे राहील. आत्मनिर्भरचा नारा आज देशात आहे. पण खरी सुरुवात बारामतीत झाली याचा अभिमान आहे, असंही त्यांनी सांगितलं.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, शहरात आल्यावर डिस्ट्रक्शन येतात. कोविडमुळं सगळ्यांना वाटायला लागलं की, आर्गनिक वस्तू चांगल्या. आमच्या आजीकडं खपली गव्हाची चपाती असायची. मुंबई, बंगळुरु, कोलकाता येथील मोठ्या घरांमध्ये किंवा हॉटेलमध्ये फॅशनमध्ये सळीचा तांदुळ, खपली गव्हाची चपाती.
या जुन्या गोष्टी आता शहरात बघायला मिळतात. बारामती अॅग्रीकल्चर ट्रस्ट ही जुन्या गोष्टी रिव्हाईव्ह करून शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल. यातून चांगलं आरोग्य कसं राहील, याची चांगली सांगळ घातली जात आहे.
रागीचं बिस्कीट, सोलापूरची कडक भाकरी
रागीचं बिस्टीक, सोलापूरची कडक भाकर, हातसळीचा तांदुळ, बचतगटानं बनविलेले मसाले यांना ऑर्गनिक म्हणतात. यांना आता खूप मोठी किंमत पुण्या, मुंबईसारख्या शहरातं लावली जाते. मार्केटिंग आणि ब्रँडिंग होते, अशी माहिती त्यांनी दिली.
भिमथळी अॅग्रीकल्चर ट्रस्ट आणि शारदा ट्रस्ट यांनी मिळून या वस्तूंचं ब्रँडिंग केलं. डी मार्ट, रिलायन्स येथे या वस्तू जातात. या नॅशलन लेवलच्या दुकानात जावं, यासाठी प्रयत्न करतो. बचतगट म्हणजे नवीन इन्नोव्हेशन. सायंटिफिक टेंपर असला पाहिजे, असंही त्या म्हणाल्या. बारामतीत जलतरण तलावाच्या उद्घाटनीय कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
राज्य प्रत्येक गोष्टीत पहिला असला पाहिजे. सामाजिक बदल, 50 वर्षांपूर्वी चर्चा होत नव्हती. तेव्हा शरद पवार यांनी हे सामाजिक बदल केले आहेत. भीमतळीचा उपक्रम इंदापूर तालुक्यातील आहे. भीमतळी जत्रा यातून राज्याची संस्कृती साजरी केली जाते. या वस्तू अॅमेझानमध्ये असतील. राष्ट्रीय स्तरावर सुरू आहे.
या सर्व आत्मनिर्भर प्रकल्पांची सुरुवात खऱ्या अर्थानं शरद पवार यांनी बारामतीत सुरू केल्या. त्या आत्मनिर्भर होत्या. जो पाण्यात पडेल तो हातपाय हलवेल, हे आम्हाला लहानपणापासून माहीत होतं. मी शालेय जीवनात जलतरण स्पर्धेत सहभागी झाले. जुन्या गोष्टी आता पुन्हा पुढे येतायत. त्यापैकी एक म्हणजे आत्मनिर्भर भारत होय.