Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरीचा थरार रंगणार कुठं?, चंद्रकांत पाटलांनी जाहीर केलं ठिकाण

कोथरुडकरांसाठी खऱ्या अर्थानं ही मेजवाणी ठरेल. भारतीय खेळांना उभारी देणाऱ्या स्पर्धा भव्यदिव्य स्वरुपात होणं सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरीचा थरार रंगणार कुठं?, चंद्रकांत पाटलांनी जाहीर केलं ठिकाण
चंद्रकांत पाटलांनी जाहीर केलं ठिकाण
Follow us
| Updated on: Sep 14, 2022 | 8:15 PM

कुस्तीपटूंना (wrestler) प्रतीक्षा असते ती महाराष्ट्र केसरीची. यंदा महाराष्ट्र केसरीचा थरार हा डिसेंबरमध्ये रंगणार आहे. कोथरुड (Kothrud) येथे कुस्तीचा थरार रंगणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण,वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या फेसबूक अकाउंटवर शेअर केली. फेसबूक अकाउंटवर पाटील म्हणतात, महाराष्ट्रातील कुस्तीचा कुंभमेळा (Kumbh Mela) असणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार यंदा डिसेंबरमध्ये कोथरूड येथे रंगणार आहे, ही आनंदाची बाब आहे.

मोहोळ कुटुंबीयांकडे जबाबदारी

स्व. मामासाहेब मोहोळ यांच्या संकल्पनेतून आणि दूरदर्शी विचारातून महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा सुरू झाली. महाराष्ट्र केसरी स्पर्धा आज मोठ्या शिखरावर पोहोचली आहे. यंदा या स्पर्धेची जबाबदारी मोहोळ कुटुंबीयांकडे आहे. त्यामुळे हे माझ्यासाठी घरातीलच कार्य आहे. ते सिद्धीस नेण्यासाठी मी स्वतःही प्रयत्न करणार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

हे सुद्धा वाचा

स्पर्धा संस्मरणीय ठरणार

आपल्या मातीतला खेळ असणाऱ्या कुस्तीची स्पर्धा कोथरूडकरांसाठी आहे. समस्त कुस्तीप्रेमींसाठीही निश्चितच संस्मरणीय ठरेल, असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

मातीतला खेळ कुस्ती

अंजली कुळकर्णी यांनी त्यावर आपली प्रतिक्रिया नोंदविली आहे. त्या म्हणतात, आपल्या मातीतील खेळ कुस्ती हा सर्वांना लोकप्रिय आहे. महाराष्ट्र केसरी या स्पर्धेने त्याचा नावलौकिक वाढविला आहे.

खऱ्या अर्थानं मेजवाणी

अनुराधा येडके म्हणतात, कोथरुडकरांसाठी खऱ्या अर्थानं ही मेजवाणी ठरेल. भारतीय खेळांना उभारी देणाऱ्या स्पर्धा भव्यदिव्य स्वरुपात होणं सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.