पुणे अपघातमध्ये अटक झालेले सुरेंद्र अग्रवाल कोण आहेत?, छोटा राजनसोबत काय संबंध?
Pune Hit & Run Case : पुणे हिट अँड रन केसमध्ये आता नवीन अपडेट समोर आली आहे. सुरेंद्र अग्रवाल यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नेमके कोण आहेत सुरेंद्र अग्रवाल जाणून घ्या.
पुणे अपघात प्रकरणामध्ये नवीन ट्विस्ट समोर आला आहे. या अपघातामध्ये आता सुरेंद्र अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. इतकंच नाहीतर त्यांना तीन दिवसांची म्हणजेच 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र सुरेंद्र अग्रवाल यांना नेमकी कोणत्या कारणामुळे अटक करण्यात आली? याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. इतकंच नाहीतर सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर शिवसेनेचे नेते अजय भोसले यांनी गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात सुरेंद्र अग्रवालचे अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर येण्याची शक्यता आहे.
सुरेंद्र अग्रवाल कोण आहेत?
सुरेंद्र अग्रवाल हे अल्पवयीन आरोपीचे आजोबा आहेत. तर त्यांचा मुलगा प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक विशाल अग्रवाल आहे. आता तिघेही तुरूंगात आहेत. विशाल अग्रवाल याला न्यायालयीन कोठडी सुनावली, अल्वपयीन आरोपी बालसुधार गृहात असून आता त्याचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना पोलीस कोठडी झाली आहे. सुरेंद्र अग्रवाल यांची पोलीस आता कसून चौकशी होणार आहे.
अजय भोसलेंकडून सुरेंद्र अग्रवालांवर आरोप
सुरेंद्रकुमार अग्रवाल यांच्यावर 2009 ला बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्याप्रकरणीचा गुन्हा दाखल आहे त्याचा तपास सीबीआय करत आहे. 2009 ला झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर सुरेंद्रकुमार अग्रवाल यांचे छोटा राजनशी संबंध असल्याचे उघड झालं होतं. पुण्यातील शिवसेनेचे नेते अजय भोसले यांच्यावर गोळीबार प्रकरणा सुरेंद्रकुमार अग्रवाल सह आरोपी आहे. ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात सुरेंद्र अग्रवाल यांनी ड्रायव्हर गंगाराम पुजारी याला धमकावणे, डांबुन ठेवणे, मोबाईल काढून घेणे या प्रकरणी येरवडा पोलिसात गुन्हा दाखल करून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुरेंद्र अग्रवाल याला अटक केलीय. त्यामुळे आता ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात सुरेंद्र अग्रवाल विरोधात काय कारवाई होणार हे पाहवं लागणार आहे.
दरम्यान, या अपघात प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे. कल्याणीनगर पुणे येथील अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून मागील तीन दिवसात 14 पथकांमार्फत राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत शहरातील तसेच जिल्ह्यातील 49 पब आणि बार वर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले असून ते बंद करून सील करण्यात आले आहे.याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी दिली.