माझ्या पक्षाचा बाप कोणीच नाही, मीच माझ्या पक्षाचा बाप, प्रकाश आंबेडकर असं का म्हणालेत?
शिवसेनेवर परिणाम कसा होईल, काही सांगता येत नाही.
अभिजित पोते, TV9 मराठी, प्रतिनिधी, पुणे : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले, व्यक्तिगत आरोप होतात तेव्हा त्याचा परिणाम फार नसतो. पण, संस्थात्मक आरोप होत असतील तर त्याचं गांभीर्य जास्त असते. शिवसेनेचं चिन्ह गोठविणं, नाव गोठविलं हे अधिकार त्या निवडणूक आयोगाकडं आहे का? निवडणूक आयोग मनमानी करते. एखादा पक्ष फ्रीज करणं हे अधिकार निवडणूक आयोगाला आहेत का? हे सर्वोच्च न्यायालयानं तपासला पाहिजे, असं मला वाटतं, असंही ते म्हणाले.
शिवसेनेवर परिणाम कसा होईल, काही सांगता येत नाही. येणाऱ्या दहा वर्षात नवीन राजकारणाची सुरुवात होईल, असं दिसते. धर्माचं राजकारण ६० वर्षानंतर दिसायला लागलं. हे राजकारण आशादायक नाही. धर्माच्या राजकारणात फेज संपत आला आहे. नवीन चेहरे, नवीन विचारधारा येण्यास सुरवात होईल. यात शिवसेनेचं काय होईल, माहीत नाही.
मागच्या दीड महिन्यापूर्वी रेखाताई ठाकूर यांनी पत्रकार परिषद बोलावली. दीड महिन्यानंतर काँग्रेस, शिवसेनेकडूनही निरोप आलेला नाही. त्यामुळं आज गरजेपोटी प्रत्येकाला वेगवेगळं लढावं लागेल. काँग्रेस, एनसीपीची युती होते की, नाही हे अद्याप अस्पष्ट आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेनं जाहीर केलं की, निवडणूक लढविणार. काँग्रेस, एनसीपीनं पाठिंबा दिला. डावे पक्षसुद्धा गेलेत. खासगीमध्ये शिवसेना म्हणते आम्हाला पाठिंबा दिला जात आहे. आम्ही भाजपविरोधक आहोत, हे दाखविण्याची कोणताही पक्ष संधी सोडताना दिसत नाही.
वंचितनं भाजपवर जहरी टीका केली. माझ्या पक्षाचा बाप कोणीच नाही. माझ्या पक्षाचा बाप मीचं आहे. भाजपसोबत जाण्यापासून कोण थांबवितो. त्यांना आडवा पाडेल.
सुषमा अंधारे यांनी पंतप्रधानांची मिमीक्री केली. मोदींवर बोलल्यानंतर गुन्हे दाखल झाले. यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, कोण या सुषमा अंधारे यांना मी ओळखत नाही. चळवळीच्या ठिकाणी माझी त्यांच्याशी भेट झाली असं मला वाटत नाही.
चारीत्र बघीतलं पाहिजे. केतकीनसुद्धा मिमीक्री केली. तिनं रिट्वीट केलं. तिच्यावर कारवाई झाली की नाही. लोकं शहाणे झाले आहेत, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.