राजकारणात सध्या ऐकू नये, पाहू नये अशा गोष्टी, राज ठाकरे असं का म्हणालेत?
विधानसभेत होणाऱ्या चर्चेत मला ऐकवत नाही. ते बाहेर पण येऊ नये. मग विचार येतो कुठे घेऊन चाललो आपण.
पुणे : वेग आपल्या आयुष्यात आला तो एमटीव्ही टेलिव्हीजनवर. डोळे, कान यांना वेग एमटीव्हीनं दिला. एक फ्रेम दाखवत नाहीत, अशी एडिटिंग होती. कालांतरानं वेगाबरोबर पुढं आलो. फरफटत आलो आहोत. त्यामुळं वेगामध्ये चित्रपट, नाटक, साहित्य, राजकारण बदललं. बदल हा गरजेचा आहे. बदल जीवावर उठणार असेल तर काय करायचा, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. राजकारणात अनेक गोष्टींना फाटे फुटत आहेत. राजकारणात सध्या ऐकू नये, पाहू नये अशा गोष्टी आहेत, असंही राज ठाकरे म्हणाले. आधी मुंबई बरबाद व्हायला वेळ गेला. आता पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही. असा इशारा पुणे येथे व्याख्यानात बोलताना राज ठाकरे यांनी दिला.
तुमच्या पुढच्या पिढीशी निगडित राजकारण नासवले जाते. चांगल्या लोकांच्या हातात राजकारण नाही. कोश्यारी म्हणाले गुजराती आणि मारवाड्यामुळे महाराष्ट्र घडला. पण गुजराती आणि मारवाडी त्यांच्याकडे काही होत नाही म्हणून ते महाराष्ट्रात आले, असा खोटक टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.
विधानसभेत होणाऱ्या चर्चेत मला ऐकवत नाही. ते बाहेर पण येऊ नये. मग विचार येतो कुठे घेऊन चाललो आपण. महाराष्ट्राचा माणूस गप्प का आहे. एवढंच सांगण्यासाठी इकडे आलोय. मला व्याख्यान द्यायचा नाहीय. आपण राज्याचा विचार करणार आहोत की नाही, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. काल म्हणे बेळगाव कारवारवर एकमत झालं. पण 60-70 वर्षांपासून हे ऐकतोय. आपण मूळ विषयाला हात घालत नाही आहोत. परदेशी आणि भारतीय कंपन्यांनी मिळून हा महाराष्ट्रत व्हीलरचे डम्पिंग ग्राउंड केलं आहे. आपण आपल्या आमदारांना हा प्रश्न विचारला पाहिजे. म्हणून राजकरणात या वयाचे बंधन नाही.
एम. एफ. हुसेन यांनी वयाच्या 60 व्या वर्षी करिअर सुरू केले. तुम्ही राजकारणात आले पाहिजे. अनेक कलाकारांनी आपली डॉक्टरी व्यवसाय सोडून कला क्षेत्रात आले. मी सगळ्या लोकांना आणणार राजकारणात, असंही राज ठाकरे म्हणाले. राजकारण वारसा बिरसा काही लागत नाही. वारसा नसताना यशस्वी झाले आहेत. काही जण लादत असतात. मग काय परिस्थिती झाली आपण बघितलं. राजकारणात या मी आपल्यासोबत आहे, असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं.