गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात महिलांना का घ्यावी लागली हातात काठी?

महिलांना हातात काठ्या घेऊनही तरुण काही ऐकत नव्हते. त्यामुळं धुडगूस घालणाऱ्या तरुणांना अखेर पोलिसांचीच भीती दाखविली. गौतमीच्या अदांवर राज्यातील अनेक तरुण फिदा आहेत.

गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात महिलांना का घ्यावी लागली हातात काठी?
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 9:31 PM

पुणे : कार्यक्रम होता सबसे कातील गौतमी पाटील (Gautami Patil) हिचा. स्थळ होतं पुणे (Pune) जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातलं बहिरवाडी. गौतमी पाटील हीचं गाण सुरू झालं. तरुण नाचायला लागले. अक्षरशः धुडगूस सुरू झाला. त्यामुळं आयोजकांना गौतमीचं गाणं लगेचं थांबवावं लागलं. या तरुणांना थांबविण्यासाठी गावातल्या महिलांना (Women) चक्क काठ्या घ्याव्या लागल्या. धूडगूस घालणाऱ्या महिलांना तरुणांवर काठ्या उगारण्याची वेळ आली. तरीही तरुण काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. बराच वेळ कार्यक्रम थांबवावा लागला. गौतमीच्या गाण्यावर नाचणाऱ्या तरुणांची समजूत काढावी लागली.

गर्दीला आवरण हाताबाहेर

नंदाताई यांनी हातात काठी घेतली. तरुणांनी त्या महिलांचा आदर्श घ्या, असं आवाहन आयोजकांना करावं लागलं. महिलांना हाती काठी घ्यावी लागते, थोडी लाज राखा असं आवाहनही आयोजकांनी केलं. बहिरवाडीतल्या कार्यक्रमाला आजूबाजूच्या गावातील शेकडो तरुण आले होते. त्यामुळं चांगलीचं गर्दी झाली होती. गर्दीला आवरणं आयोजकांच्या हाताबाहेर गेलं होतं.

हे सुद्धा वाचा

महिलांनी हातात घेतल्या काठ्या

महिलांना हातात काठ्या घेऊनही तरुण काही ऐकत नव्हते. त्यामुळं धुडगूस घालणाऱ्या तरुणांना अखेर पोलिसांचीच भीती दाखविली. गौतमीच्या अदांवर राज्यातील अनेक तरुण फिदा आहेत. १०-२० किलोमीटरवर कुठंही गौतमीचा कार्यक्रम असला, तर तरुणांची पाऊलं त्या कार्यक्रमाकडं वळतातचं. गौतमीचा कार्यक्रम आणि तरुणांचा धूडगूस हे आता समीकरणचं झालं.

तरुणांनी घातला धूडगूस

गौतमीच्या अनेक कार्यक्रमांत तरुणांनी धूडगूस घातला. कधी स्टेजचं तर कधी छताचं नुकसान केलं. बीडमध्ये गौतमीच्या कार्यक्रमामुळं हायवे जाम झाला होता. काही ठिकाणी तिच्या कार्यक्रमासाठी तरुण झाडावर चढून बसले होते.

गर्दी काही कमी होईना

काही हावभावामुळे गौतमी पाटील वादात सापडली होती. अश्लील नृत्य केल्याचा तिच्यावर आरोप झाला होता. त्यानंतर गौतमी पाटील हिनं माफी मागितली होती. पण, तिच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी काही कमी झाली नाही. उलट ही गर्दी दिवसेंदिवस वाढतचं गेली. गौतमीच्या कार्यक्रमात महिलांना हाती काठ्या घ्याव्या लागल्या. उद्या पोलीस बंदोबस्त लावण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.