पतीला खांद्यावर घेणाऱ्या ‘कारभारणी’चा फोटो स्टॅम्पवर, ‘लय भारी’ म्हणत आता नवरोबाने उचललं

पोस्टाच्या तिकिटावर फोटो छापून रेणुका संतोष गुरव यांचा गौरव करण्यात आला. (Wife Carry Winning Husband Postal Stamp)

पतीला खांद्यावर घेणाऱ्या 'कारभारणी'चा फोटो स्टॅम्पवर, 'लय भारी' म्हणत आता नवरोबाने उचललं
रेणुका गुरव यांचं पोस्टाचं तिकीट देऊन सन्मान
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 2:26 PM

पिंपरी चिंचवड : ‘माझा कारभारी लय भारी’ असं म्हणत ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी पतीला खांद्यावर उचलून घेणाऱ्या कारभारणीचं राज्यभरात कौतुक झालं. आता केंद्र सरकारच्या डाक विभागानेही रेणुका संतोष गुरव यांची दखल घेतली आहे. पोस्टाचं तिकीट देऊन रेणुका यांचा गौरव करण्यात आला. (Wife Carry Winning Husband on Shoulder Khed Gram Panchayat Election gets Postal Stamp)

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाळू गावच्या रेणुका संतोष गुरव या शेतकरी कारभारणीचा आनंद गगनात मावेनासा झाला. आधी पाळू ग्रामपंचायत निवडणुकीत पती संतोष गुरव यांनी विरोधी उमेदवाराचा दणदणीत पराभव केला, त्यानंतर पतीला खांद्यावर घेऊन गावातून काढलेल्या मिरवणुकीचं सोशल मीडियावर कौतुक झालं. हे कमी म्हणून की काय, पोस्टाचं तिकीट देऊन तिला सन्मानित करण्यात आलं आहे.

निवडणुकीत उमेदवार जिंकला की कार्यकर्ते त्याला खांद्यावर उचलताना आपण अनेकदा पाहिलं असेल. पण पुण्यातील पाळू ग्रामपंचायतीत पती निवडून आल्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी रेणुका गुरव यांनी चक्क पतीलाच खांद्यावर घेत मिरवणूक काढली होती.

पुणे जिल्ह्यातील पाळू ग्रामपंचायतीमध्ये जाखमाता ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा दारुण पराभव करत जाखमाता देवी ग्रामविकास पॅनलने 7 पैकी 6 जागावर वर्चस्व मिळवले. या घवघवीत यशामागे महिलांचा मोठा मोलाचा वाटा होता. त्यामुळे विजयाचा जल्लोष करत असताना गावातील विजयी उमेदवाराच्या पत्नीने आपल्या पतीच्या विजयासाठी जल्लोष केला.

पाहा व्हिडीओ – 

पाळू ग्रामपंचायतीमध्ये संतोष शंकर गुरव यांनी 221 मतं मिळवत विरोधी उमेदवारावर दणदणीत विजय मिळवला. पतीने इतकं मोठं यश मिळवल्याने पत्नी रेणुका गुरव यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी थेट पतीला खांद्यावर घेत जल्लोष साजरा केला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक जिंकल्यावर जल्लोष करण्यास, गुलाल उधळण्यास, तसेच जास्त कार्यकर्त्यांना एकत्र जमण्यास बंदी घालण्यात आली होती. त्या कायद्याचं पालन करत आनंद साजरा करण्यासाठी स्वत: पतीराजांना खांद्यावर घेतलं आणि गावात त्यांची विजयी मिरवणूक काढली.

संबंधित बातम्या :

Gram Panchayat Election 2021 Result | माझा कारभारी लय भारी!

अहमदनगरमध्ये वेगळाच ट्विस्ट, ‘नोटा’ला सर्वाधिक 502 मतं, विजयी कोण?

सोलापुरात सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य, ऋतुराजची अवघ्या 21 वर्षात ग्रामपंचायतीत एन्ट्री

(Wife Carry Winning Husband on Shoulder Khed Gram Panchayat Election gets Postal Stamp)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.