Mobile : मोबाईलचा हट्ट आला जीवाशी; परिस्थितीमुळे पतीला झाला हतबल, इकडे पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

मोबाईलच्या वेडापायी अनेक दुर्दैवी घटना घडतात. आपल्या आजूबाजूला पण मोबाईल नसल्यास बेचैन होणाऱ्यांची संख्या कमी नाही. त्यातच आपल्याकडे स्मार्टफोन असावा यासाठी अनेकांचा कोण हट्टहास असतो. त्यातूनच एक पत्नीने टोकाचे पाऊल उचल्याने पतीला जबर धक्का बसला.

Mobile : मोबाईलचा हट्ट आला जीवाशी; परिस्थितीमुळे पतीला झाला हतबल, इकडे पत्नीने उचललं टोकाचं पाऊल
पत्नीने उचलले टोकाचे पाऊल
Follow us
| Updated on: Sep 12, 2024 | 6:04 PM

सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. प्रत्येकाला रील्सचे, पोस्टचे फॅड लागले आहे. ज्याला त्याला रील स्टार व्हायचे आहे. एकदम भारी स्मार्टफोन हाती असावा आणि तो मिरवावा अशी अनेकांची इच्छा असते. अबालांपासून वयोवृद्धापर्यंत अनेकांना मोबाईलच्या व्यसनाने पछाडले आहे. काही जण आपल्या स्वभावाला आणि भावनेला मुरड घालतात. पण काही जण टोकाचे पाऊल टाकतात. मोबाईलचा हट्ट न पुरवल्याने एका पत्नीने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पतीला जबर धक्का बसला आहे.

मोबाईलचा हट्ट न पुरवल्यामुळे पिंपरी- चिंचवड मध्ये पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. शिवानी गोपाल शर्मा अस आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. गेले काही दिवसांपासून शिवानी पतीकडे मोबाईलचा हट्ट करत होती. परंतु, पतीची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने तो मोबाईल घेऊ शकत नव्हता. तरीही पती प्रयत्न करत होता. परंतु, या हट्टापायी शिवानीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

शिवानी ही अवघ्या 20 वर्षांची होती. लग्न होऊन काही दिवस झाल्यानंतर तिने पतीकडे स्मार्टफोन घेण्यासाठी तगादा लागला. पती गोपाल हा एका खासगी कंपनीत कामाला आहे. पैशांच्या अडचणीमुळे तो मोबाईल खरेदी करु शकत नव्हता. पण तरीही तो पत्नीचा हट्ट पुरवण्यासाठी प्रयत्न करत होता. आपण घरी एकटेच असतो, त्यामुळे आपल्याला मोबाईल खरेदी करुन द्यावा असा हट्ट ती सारखा धरत होती. हा हट्ट पूर्ण न झाल्याने बुधवारी शिवानीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पती जेव्हा नोकरीवरुन घरी आला. तेव्हा त्याला हादराच बसला. वाकड पोलिसांनी याविषयी चौकशी केल्यानंतर मोबाईलच्या हट्टासाठी तिने टोकाचे पाऊल उचल्याचे समोर आले.

हे सुद्धा वाचा

ती वाचावी यासाठी धावाधाव

पती गोपाल नोकरीवरुन घरी आला. त्याने दरवाजा लोटताच पत्नीने गळफास घेतल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने आरडाओरड करत शेजाऱ्यांना बोलावले. पत्नीला वाचवण्यासाठी त्याने लागलीच जवळच्या दवाखान्यात धाव घेतली. पत्नी वाचेल असे त्याला वाटत होते. पण त्याची ही अखेरची धावाधाव कामी आली नाही. डॉक्टरांनी पत्नीला तपासून मृत घोषीत केले.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.