Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Women Maharashtra Kesari : लग्नानंतर पुण्यातील वाघिण कुस्तीच्या आखाड्यात, पहिल्या महाराष्ट्र केसरीसाठी झुंजणार!

सांगलीतील पहिली महिला महाराष्ट्र केसरी किताब जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. सुवर्णकन्या कोमल लग्नानंतरही पुन्हा कुस्ती आखाड्यात उतरली असून सांगलीतील स्पर्धेत ती पुणे संघाकडून झुंजणार आहे.

Women Maharashtra Kesari : लग्नानंतर पुण्यातील वाघिण कुस्तीच्या आखाड्यात, पहिल्या महाराष्ट्र केसरीसाठी झुंजणार!
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 6:20 PM

संजय दुधाणे, पुणे : जागतिक कुस्ती स्पर्धेत सहभागी झालेली पहिली महाराष्ट्रीन महिला कुस्तीगीर कोमल गोळे ही आता सांगलीतील पहिली महिला महाराष्ट्र केसरी किताब जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. सुवर्णकन्या कोमल लग्नानंतरही पुन्हा कुस्ती आखाड्यात उतरली असून सांगलीतील स्पर्धेत ती पुणे संघाकडून झुंजणार आहे.

पहिली महिला महाराष्ट्र केसरी व 24 वी राज्य अजिंक्यपद महिला कुस्ती स्पर्धा सांगलीत सुरू झाली आहे. या स्पर्धेतील महाराष्ट्र केसरी किताबाच्या 65 ते 74 किलो वजनी गटात कोमल खेळणार आहे. कोल्हापुरात राम सारंग यांच्या राष्ट्रकुल कुस्ती संकुलात मेहनत घेऊन कोमलने कुस्तीत पुनरागमन केले आहे. लग्नानंतर काही काळ तिने विश्रांती घेतली होती, कुस्ती प्रशिक्षणाचा एनआयएस अभ्यासक्रम पूर्ण करून तीने वयाच्या 30 व्या वर्षी पुन्हा स्पर्धात्मक कुस्ती खेळण्याचा निर्णय घेतला आहे. 2018 मध्ये वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यांनंतर तिची 2019 मध्ये जागतिक महिला कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली होती.

सांगलीत प्रथमच होणाऱ्या महिलांच्या महाराष्ट्र केसरी किताबासाठी कोमलने कसून सराव केला आहे. आधी आई-वडीलांचे आता पती संदिप यादव यांची तिला साथ तिला मिळत आहे. फायनल गाठण्यासाठी तिला कोल्हापूर, पुणे, नगर व सांगलीच्या तुल्यबळ खेळाडूंशी शर्थ करावी लागणार आहे. पहिली महाराष्ट्र केसरी होण्यासाठी तिला कोल्हापूर, पुणे, नगर व सांगलीच्या तुल्यबळ खेळाडूंशी शर्थ करावी लागणार आहे.

दरम्यान, लग्नानंतर अनेक महिला आपली स्वप्न विसरून संसाराला लागतात. मात्र कोमलने कस्तीसारख्या खेळात लग्न झाल्यावर वयाच्या 30 व्य वर्षी  पुनरागमन करत इतर महिलांसमोर एक आदर्श ठेवला आहे. कोमल तिने घेतलेल्या मेहनतीचा आणि केलेल्या सरावाचा स्पर्धेमध्ये पूर्ण फायदा करून घेईल. पहिली महिला महाराष्ट्र केसरी बनण्याचा किताब आपल्या नावावर करण्याचा तिचा प्रयत्न असणार आहे.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.