पुणे – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Union Minister Smriti Irani)आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याला विरोध करत महिला काँग्रेसने (Woman Congress )आंदोलन केलं. महिला काँग्रेसच्या सदस्यांनी महागाईच्या विरोधात चूल आणि बांगड्या घेऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी आंदोलन (Andolan)केले. यावेळी महिला आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. प्रत्येकाला बोलण्याचा , व्यक्त होण्याचा अधिकार आहे. मात्र आमच्या महिला काँग्रेसच्या सदस्यांना पोलिसांनी आंदोलन स्थळावरून जबरदस्तीने आम्हाला उचलून आणले आहे, असा आरोपही यावेळी महिलांनी केला आहे. आम्ही केवळ निषेध म्हणून त्यांना चूल भेट देणारा होतो अशी भावना महिलाआंदोलकांनी व्यक्त केली आहे.
महागाईच्या विरोधात आंदोलन करताना महिला आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. ज्या ठिकाणी केन्द्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी या काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.मात्र त्यानंतर लगेच चतुःशृंगी पोलिसांनी या सर्व महिला आंदोलकांना ताब्यात घेतले. केंद्र सरकारचा निषेध म्हणून स्मृती इराणी यांना बांगड्या व चूल भेट देणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे. मात्र स्मृती इराणी यांनी आम्हाला भेट नाकारली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.