Pune Metro : पुणे मेट्रोचा भुयारी मार्ग पाहिला का? महत्त्वाचा टप्पा झाला पूर्ण; पाहा VIDEO

एकूण बारा किलोमीटरचा हा टप्पा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आव्हानात्मक मानला जात होता. तो आता पूर्ण झाला आहे. या मार्गांसाठी टीबीएम मशीनचा वापर करण्यात आला होता. स्वारगेट येथून निघालेली टीबीएम मशीन नंतर बुधवार पेठ स्थानकात पोहोचली.

Pune Metro : पुणे मेट्रोचा भुयारी मार्ग पाहिला का? महत्त्वाचा टप्पा झाला पूर्ण; पाहा VIDEO
पुणे मेट्रो अंडरग्राऊंड काम करणारी टीबीएम मशीनImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 04, 2022 | 4:40 PM

पुणे : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. स्वारगेट ते बुधवार पेठ अंडरग्राऊड मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. स्वारगेटवरून बुधवार पेठकडे येणारी मुठा टीबीएम मशिन (TBM) बुधवार पेठ स्थानकात बाहेर पडली आहे. एकूण 12 किमीचा हा मार्ग असून आता याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित भुयारी मार्गात (Underground route) सिग्नलिंग यंत्रणा, मेट्रोचे रूळ, विद्युत व्यवस्था अशी कामे करण्यात येणार आहेत. अंडरग्राऊंड दोन मार्ग आहेत. एक म्हणजे स्वारगेटकडे जाणारा आणि दुसरा स्वारगेटकडून येणारा. या मार्गात रेल्वे रूळ टाकण्याचे काम सुरू आहे. विद्युत यंत्रणा बसविण्याचे काम दुसऱ्या मार्गात सुरू आहे. मेट्रोसाठी हे दोन स्वतंत्र बोगदे तयार करण्यात आले आहेत. पुणेकर या मेट्रोची (Pune metro) वाट पाहत आहेत. त्यादृष्टीने या मार्गाचा महत्त्वाचा टप्पा आज पार पडला आहे.

पुढील मार्चपर्यंत धावणार मेट्रो?

जानेवारी 2022मध्ये पहिल्या बोगद्याचे काम पूर्ण झाले. मंडईपासून बुधवार पेठ मेट्रोच्या स्थानकादरम्यान दुसऱ्या बोगद्याच्या शेवटच्या टप्प्यातील जवळपास 1.2 किमी अंतराच्या खोदकामाला जानेवारीत सुरुवात झाली होती. हे काम करणारी मशीन टनेल बोअरिंग मशीन म्हणजेच टीबीएम आज बाहेर पडली आहे. हा भुयारी मार्ग न्यायालयापासून मुठा नदीच्या पात्रातून बुधवार पेठेकडे गेला आहे. या मार्गात स्वारगेट, मंडई, बुधवार पेठ, न्यायालय तसेच शिवाजीनगर अशी पाच स्थानके आहेत. मे अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र ते आज पूर्ण झाले आहे. तर पुढील वर्षातील मार्चपर्यंत भुयारी मार्गातील काही स्थानकांत मेट्रो धावू शकणार आहे.

हे सुद्धा वाचा

कसा आहे भुयारी मार्ग?

आव्हानात्मक टप्पा पूर्ण

एकूण बारा किलोमीटरचा हा टप्पा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आव्हानात्मक मानला जात होता. तो आता पूर्ण झाला आहे. या मार्गांसाठी टीबीएम मशीनचा वापर करण्यात आला होता. स्वारगेट येथून निघालेली टीबीएम मशीन नंतर बुधवार पेठ स्थानकात पोहोचली. त्यानंतर कामगारांनी जल्लोष केला. तिरंगा फडकावण्यात आला. उर्वरित कामही लवकरच पूर्ण केले जाणार आहे. यात सिग्नलिंग यंत्रणा, मेट्रोचे रूळ, विद्युत व्यवस्था आदी कामे बाकी आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.