Pune Metro | अखेर पुणे मेट्रोच्या वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट मार्गिकेचे काम पूर्ण ; 6 मार्च होणार उदघाटन
पुणे मेट्रोच्या वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. या 27.1 किलोमीटर मार्गिकेवरील 12 किलोमीटरची कामे पूर्ण झाली असून हा मार्ग प्रवाशांना खुला करण्यासाठी तयार झाला आहे.
पुणे – शहरात वेगवान वाहतुकीचे जाळे निर्माण करणाऱ्या मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.येत्या 6 मार्चला हा कार्यक्रम पार पडणार आहे. य यानिमित्ताने मेट्रोच्या कामाला वेग आलाअसून , पुणे मेट्रोच्या (Pune Metro)वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. या 27.1 किलोमीटर मार्गिकेवरील 12 किलोमीटरची कामे पूर्ण झाली असून हा मार्ग प्रवाशांना खुला करण्यासाठी तयार झाला आहे. तर उर्वरित 15.1 किलोमीटर अंतरावरील कामे अंतिम टप्प्यात असून तो मार्ग देखील लवकरच प्रवाशांसाठी सुरू होणार असल्याची माहिती महामेट्रो प्रशासनाने दिली आहे. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट (Pimpri-Chinchwad to Swargate) ही 11.4 किलोमीटरची मार्गिका असून त्यामध्ये 14 स्थानके आहेत.
इतर स्त्रोत्रातून महसूल मिळवण्याकडे लक्ष
पुणे मेट्रो रेल्वेत इतर स्रोतातून महसूल मिळवण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. यासाठी मेट्रो स्थानकात जाहिराती, तसेच व्यासायिका जागा भाडेतत्वावर आदी गोष्टीचा विचार केला जात आहे. यातूनच जवळपास 50 टक्के भाडेवाढ केली जात आहे. मेट्रोमध्ये भाडेवाड कमी ठेवता अधिक फेऱ्या करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. मेट्रोतील तिकिटाचा दर अद्याप केला नसला तरी सुरुवातीला भाडे हे 10 रुपये ते जास्तीत जास्त 50 रुपयांपर्यंत असणार असल्याची माहिती मेट्रोच्या प्रशासनाने दिली आहे.
व्यावसायिक फेऱ्यांना सुरुवात
वनाज ते गरवारे महाविद्यालय आणि पिंपरी चिंचवड ते फुगेवाडी या 12 किमीच्या मार्गामध्ये दोन विभाग आहेत, दोन्ही विभागांमध्ये प्रत्येकी पाच स्थानके आहेत. मेट्रोच्या उद्घाटनानंतर पुणे मेट्रो रेल्वेचे व्यावसायिक फेऱ्यांना सुरुवात होईल. दरम्यान, पहिल्या टप्प्यात 33.1 किमीच्या दोन मार्गावरील सेवा – वनाझ ते रामवाडी आणि PCMC ते स्वारगेट .
‘लोक मला ‘कालिया’ म्हणायचे’; रेमो डिसूझाने सांगितला वर्णभेदाचा कटू अनुभव
MahashivRatri | प्रसिद्ध घृष्णेश्वर मंदिरात आठ दिवस यात्रा, जड वाहनांसाठी कोणता मार्ग सोयीस्कर?