Pune Wrestling competition : ओमकार येलभर आणि कोमल शितोळे ‘मल्लसम्राट’; पुण्यातील शिरूरमध्ये उत्साहात झाली कुस्ती स्पर्धा
शिरूर (Shirur) मल्लसम्राट 2022 कुस्ती स्पर्धेत ओमकार येलभर व आदित्य पवार यांच्यात अंतिम लढत झाली. या अटीतटीच्या लढतीत ओमकार येलभर याने आदित्यचा पराभव केला. महिलांच्या अंतिम लढतीत कोमल शितोळे व श्रद्धा होळकर यांच्यात अंतिम लढत झाली. या अंतिम लढतीत कोमल हिने विजय मिळवला आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये मल्लसम्राट कुस्ती स्पर्धा (Kushti) उत्साहात पार पडली. गेल्या 19 वर्षांपासून अविरतपणे ही स्पर्धा सुरू आहे. यावर्षी या कुस्ती स्पर्धेत अनेक पैलवान मुले आणि मुलींनी सहभाग घेतला होता. या शिरूर (Shirur) मल्लसम्राट 2022 कुस्ती स्पर्धेत ओमकार येलभर व आदित्य पवार यांच्यात अंतिम लढत झाली. या अटीतटीच्या लढतीत ओमकार येलभर याने आदित्यचा पराभव केला आणि शिरूर मल्लसम्राट म्हणून विजेतेपद मिळवले. त्याला मानाची गदा तसेच एक बुलेट गाडी बक्षीस देण्यात आली आहे. तर महिलांच्या अंतिम लढतीत कोमल शितोळे व श्रद्धा होळकर यांच्यात अंतिम लढत झाली. या अंतिम लढतीत कोमल हिने विजय मिळवला आहे. या स्पर्धेचे आयोजन शेखर पाचुंदकर यांनी केले होते. तर आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
तरळले आनंदाश्रू
मल्लसम्राट कुस्ती स्पर्धेचा विजेता ठरल्यानंतर ओमकार येलभर याचा सत्कार आयोजित करण्यात आला. यावेळी त्याला मानाची गदा तसेच एक बुलेट गाडी भेट देण्यात आली. यावेळी त्याने केलेला संघर्ष आणि त्यानंतर मिळालेला विजय याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. यावेळी त्यांच्या डोळ्यांतून अश्रू आलेले पाहायला मिळाले.