Book contro : ‘कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव’ पुस्तक वादात, लेखकाला जीवे मारण्याची धमकी
कोरेगाव भीमा (Koregaon bhima) लढाईचे वास्तव पुस्तक (Book) लिहिलेल्या लेखकाला जीवे मारण्याची धमकी (Threat) देण्यात आली आहे. मोबाइलवरून ही धमकी देण्यात आली आहे. लेखकाने सांगवी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. रोहन जमादार असे लेखकाचे नाव आहे.
पुणे : कोरेगाव भीमा (Koregaon bhima) लढाईचे वास्तव पुस्तक (Book) लिहिलेल्या लेखकाला जीवे मारण्याची धमकी (Threat) देण्यात आली आहे. मोबाइलवरून फोन करून ही धमकी देण्यात आली आहे. लेखकाने सांगवी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. रोहन जमादार (माळवदकर) असे लेखकाचे नाव आहे. ‘1 जानेवारी 1818 कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव’ हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. लेखक कोरेगाव भीमा येथील रहिवासी आहेत. तसेच विजय स्तंभाची जमीन रोहन जमादार यांच्याच नावावर आहे. रोहन हे वकील आहेत. दरम्यान, आता त्यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. याबाबत त्यांनी तक्रार दाखल केली आहे. मागील अनेक दिवसांपासून हे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात आहे. आंबेडकर अनुयायांनी या पुस्तकाला विरोध केला आहे. तसेच हे पुस्तक मागे घ्यावे, यावर बंदी घालावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.
‘पुराव्याच्या आधारेच लेखन’
रोहन जमादार यांनी हे पुस्तक पुराव्यांच्या आधारावरच लिहिले आहे. त्यांनी विविध पुरावेही पुस्तकात सादर केलेले आहे. मात्र तरीही मागील काही दिवसांपासून हे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
आधीही आले धमक्यांचे फोन
लेखक रोहन जामदार यांना आधीही धमकीचे फोन आले होते. यासर्व धमक्यांचे फोन रेकॉर्ड करून ते सोशल मीडियावरही अपलोड करीत असतात. 1 जानेवारीला आंबेडकर अनुयायी याठिकाणी येवून स्तंभाला भेट देत असतात. राज्याच्या विविध भागातून अनुयायी अभिवादनासाठी येतात. मात्र यावरच्या इतिहासावरचे वास्तव त्यांनी आपल्या पुस्तकात मांडले आहे. यालाच विरोध होत आहे.