नसिरुद्दीन शाह, फरान अख्तर आणि स्वरा भास्कर स्लीपर सेल : योगेश सोमण

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे संचालक योगेश सोमण यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे (Yogesh Soman called sleeper cell to Naseeruddin Shah).

नसिरुद्दीन शाह, फरान अख्तर आणि स्वरा भास्कर स्लीपर सेल : योगेश सोमण
Follow us
| Updated on: Jan 30, 2020 | 6:28 PM

पुणे : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे संचालक योगेश सोमण यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे (Yogesh Soman called sleeper cell to Naseeruddin Shah). सोमण म्हणाले, “जेएनयू वर्षानुवर्षांची विषवल्ली आहे. या संस्थांमध्ये विष पेरुन पिढ्यानपिढ्या तयार केल्या आहेत. अभिनेते नसिरुद्दीन शाह, फरान अख्तर आणि स्वरा भास्कर हे देखील स्लीपर सेल आहेत (Yogesh Soman called sleeper cell to Naseeruddin Shah).” ते पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) व्याख्यानात बोलत होते. ‘सीएए देश की जरुरत, जेएनयू का सच’ असा या व्याख्यानाचा विषय होता.

योगेश सोमण म्हणाले, “हिंदुस्तान धर्मशाळा आहे का? इथं कोणीही यावं आणि कसंही राहावं. मतासाठी काही राजकीय पक्ष घरदार सेट करून देत आहेत. जेएनयू ही वर्षानुवर्षांची विषवल्ली असून अशा अनेक शिक्षण संस्था देशात आहेत. इथं विष पेरुन पिढ्यानपिढ्या तयार केल्या जातात. या स्लीपर सेल असून फरान अख्तर, स्वरा भास्कर आणि नसिरुद्दीन शाह हे तिन्ही अभिनेते स्लीपर सेल आहेत. नसिरुद्दीन शाह या देशात मुसलमान म्हणून राहण्याची भीती वाटत असल्याचं म्हणतात. म्हणजे ते 2014 नंतर इथं आले का?”

आता आपण ठरवल्याप्रमाणे समान नागरी कायदा येणार आहे. जेएनयूसारखं विचित्र पद्धतीने आंदोलन झाल्यास तसंच ठाम आणि आक्रमक पद्धतीनं उत्तर दिलं पाहिजे. मी संघर्षाला प्रेरित करण्याचा प्रयत्न करत आहे. राजकीय पक्ष आपला जाहीरनामा तयार करतात. मात्र हे जाहीरनामे पक्ष कार्यालयात धूळखात पडतात. काँग्रेसचा जाहीरनामा तर मुंबईत भेळ विक्रीसाठी वापरल्याचं पाहायला मिळालं. भेळ विक्रेत्याला हा कचऱ्यात फुकट मिळाला असल्यानं तो पुड्या तयार करत असेल. अशा पद्धतीनं जाहीरनाम्याची नाही, तर विचारांची विल्हेवाट लावली जात असल्याचा आरोप सोमण यांनी केला.

“भाजपने देशहितासाठी अनेक निर्णय घेतले”

योगश सोमण यांनी आपल्या भाषणात भाजपवर कौतुकाचा वर्षाव केला. ते म्हणाले, “भाजपने देशहितासाठी अनेक निर्णय घेतले. विरोधकांनी जीएसटी आणि सर्जिकल स्ट्राईकची टवाळी उडवली. मात्र 2019 च्या निवडणुकीत भाजपचं पूर्वीपेक्षा जास्त मतानं सरकार सत्तेत आलं. मध्यंतरी अनेकांनी पुरस्कार वापसी सुरु केली. या पुरस्कार वापसीचा बोजा उडाल्याने पुरस्कार वापस करणारे कपाळाला हात लावून बसले.” पुरस्कार वापसी करणाऱ्यांनीच विद्यार्थ्यांना हाताशी धरुन विरोध सुरु केला आहे आणि याला बाहेरून फंडिंग होत असल्याचा आरोपही सोमण यांनी केला.

“विरोधक मुलाला 6 वेळा शिंक आल्यावर थेट मोदींपर्यंत जातात”

सोमण यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “70 वर्षांमध्ये तुमच्याकडून काहीच झालं नाही. मात्र आता 6 महिन्यात तुम्हाला सर्व हवंय. विरोधकांच्या एखाद्या मुलाला 6 वेळा शिंक आल्यावर ते थेट मोदींपर्यंत जातात. सरकारने काहीतरी केलं पाहिजे. माझ्या मुलाला 6 वेळा शिंक आली, असं सांगत विरोधक सैरभैर होतात.”

विरोधकांना सध्या कोणताच मुद्दा सापडत नसल्याने सीएएवरून फूट पाडली आहे. कम्युनिस्टांचं वर्चस्व असलेल्या विद्यापीठांवर हे सर्व सुरु आहे. पथनाट्य, डफ वाजवून गाणे म्हणत जोरदार करमणूक केली जात आहे. कोरिओग्राफ केल्याप्रमाणे नाचत असल्यानं व्हिज्युवली चांगलं दिसतं. ते गाणं गात एखाद्या स्टार प्रमाणे करमणूक करतात आणि हे सर्व नाट्यपूर्ण असतं, असाही आरोप सोमण यांनी केला. पंतप्रधानांची हिटलरशी आणि अमित शहांची डबल हिटलर अशी तुलना करणं उर्मट असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.