वडिलांसोबत शेतातील कांदा घेऊन घरी चालला होता, वाटेत जे घडलं… अशी वेळ कुठल्याही बापावर येऊ नये !

शेतातील कांदा काढून वडिलांसोबत ट्रॅक्टर ट्रॉलीत कांदा भरुन तरुण घराकडे चालला होता. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. वाटेतच ट्रॅक्टरचा ब्रेक फेल झाला आणि होत्याचं नव्हतं झालं.

वडिलांसोबत शेतातील कांदा घेऊन घरी चालला होता, वाटेत जे घडलं... अशी वेळ कुठल्याही बापावर येऊ नये !
ट्रॅक्टर ट्रॉली पलटल्याने अपघातात तरुणाचा मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 11:17 AM

शिरुर / सुनील थिगळे : शेतातून कांदा भरुन घरी घेऊन जात असताना ट्रॅक्टर ट्रॉलीला अपघात झाल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शिरुरमधील रांजणगाव सांडस येथे घडली. अपघातात तरुणाचे वडिल जखमी झाले आहेत. ट्रॅक्टरचा ब्रेक फेल झाल्याने ट्रॅक्टर पलटी होऊन हा अपघात घडला. भूषण विजय रणदिवे असे मयत 31 वर्षीय तरुणाचे नाव आहे. याबाबत मयत तरुणाचा चुलत भाऊ आशुतोष दत्तात्रय रणदिवे याने न्हावरे पोलीस दूरक्षेत्रात फिर्याद दिली आहे. याबाबत पुढील तपास सुरु आहे. तरुणाच्या मृत्यूमुळ परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ट्रॅक्टरचा ब्रेक फेल झाल्याने घडला अपघात

रणदिवे पिता-पुत्र आपल्या शेतातील कांद्याचे पीक काढून ट्रॅक्टर ट्रॉलीत भरुन घरी येते होते. देशमुख वस्ती ते रांजणगाव सांडस न्हावरे रोडकडे येत असताना वाटेत तानाजी भंडलकर यांच्या शेताजवळ ट्रॅक्टरचा ब्रेक फेल झाला. येथे रस्ता उतार असल्याने ब्रेक फेल झाल्यानंतर ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन रस्त्याच्या उजव्या बाजूला खड्ड्यात पलटी झाला. ट्रॅक्टर पलटी झाल्याने तरुण त्याखाली आला आणि गंभीर जखमी झाला. त्याचे वडिलही यात जखमी झाले.

गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

गंभीर जखमी तरुणाला तात्काळ सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपाचारादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तरुणाच्या मृत्यूमुळे रणदिवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी न्हावरे पोलीस दूरक्षेत्रात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. तरुणा मुलाच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. अत्यंत शोकाकुल वातावरणात तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.