निकाल लागायच्या आधी पवारसाहेबांनी सांगितलं होतं की…; युगेंद्र पवारांनी सांगितली पडद्यामागची गोष्ट

Yugendra Pawar on Baramati Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काही मतदारसंघ देशात गाजले. त्यापैकीच एक म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ... बारामतीतील लढतीकडे सर्वांचच लक्ष होतं. या निवडणुकीबाबत युगेंद्र पवारांनी महत्वाचं विधान केलंय. वाचा सविस्तर...

निकाल लागायच्या आधी पवारसाहेबांनी सांगितलं होतं की...; युगेंद्र पवारांनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
Follow us
| Updated on: Jun 19, 2024 | 5:16 PM

लोकसभा निवडणुरीला बारामतीत शरद पवारांची लेक सुप्रिया सुळे विरूद्ध अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी थेट लढत झाली. पहिल्यांदाच पवार विरूद्ध पवार अशी लढत बारामतीकरांनी अनुभवली. या लढतीत नेमकं काय होणार? ही निवडणूर कोण जिंकणार याची सर्वत्र चर्चा झाली. मात्र या निवडणूक काळात शरद पवारांचं म्हणणं काय होतं? त्यांची मानसिकता काय होती? यावर अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी भाष्य केलं आहे. बारामतीतल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना युगेंद्र पवार यांनी निवडणूक काळातील एक प्रसंग सांगितला.

“पवारसाहेब म्हणाले….”

आपण जेव्हा प्रचारात उतरलो. तेव्हा काय परिस्थिती होती हे आपण पाहिलं आहे. आपण आपल्या लाडक्या खासदार यांना चौथ्यांदा निवडून दिलंय. मला अपेक्षा नव्हती की 1. 5 लाख मतांनी निवडून येऊ. पण साहेबांना माहिती होतं की बारामतीकर आपल्याला कमी पडू देणार नाहीत. निकाल यायच्या आधी मला शरद पवारसाहेबांनी सांगितलं होतं की “मला वाटतं नाही बारामतीकर आपल्याला सोडतील”… 60 वर्षे तुम्ही पवारसाहेबांना साथ दिली. सुप्रियाताईंना साथ दिली आणि आम्हाला साथ दिली. विनंती करतो इथून पुढे आम्हाला साथ देत राहा. असं युगेंद्र पवार म्हणाले.

शरद पवारांसमोर बोलणं म्हणजे…- युगेंद्र पवार

शरद पवार सध्या बारामतीचा दौरा करत आहे. ठिकठिकाणी शेतकरी मेळाव्यांना शरद पवार हजेरी लावत आहेत. यावेळी युगेंद्र पवार हे देखील शरद पवार यांच्यासोबत आहेत. आज शेतकरी मेळाव्याला युगेंद्र पवारांनी संबोधित केलं. मला इथे बोलायचं आहे, याची काही मी तयारी नव्हती. पवारसाहेबांसमोर बोलणं म्हणजे सोपं नसतं. कारण एक आदरयुक्त भीती असते, असं युगेंद्र म्हणाले.

बारामतीतील डोर्लेवाडी गावात शेतकरी मेळावा झाला. शरद पवार या मेळाव्याला हजर होते. या मेळाव्याला शरद पवार , सुप्रिया सुळे , युगेंद्र पवार उपस्थित होते. यावेळी राजकारणात मी 1962 पासून काम सुरू केलं. 1967 मध्ये मला एक युवक म्हणून विधानसभेत पाठवलं. तिथून अनेक पद मिळालं. देश, आंतराष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी तुमच्या आशीर्वादामुळे मिळाली. आज पुणे शहरानंतर बारामती हे शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र झालं आहे, असं शरद पवार म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.