महाराष्ट्रावर नवं संकट, राज्यात झिका विषाणूचा पहिला रुग्ण, आरोग्य यंत्रणा ॲलर्ट
महाराष्ट्रात एकीकडे कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याचं चित्र असताना पुणे जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेसमोर मोठं नवं संकट उभं राहिलं आहे. महाराष्ट्रात झिकाचा विषाणूचा पहिला रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळला आहे.
पुणे: महाराष्ट्रात एकीकडे कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याचं चित्र असताना पुणे जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेसमोर मोठं नवं संकट उभं राहिलं आहे. महाराष्ट्रात झिकाचा विषाणूचा पहिला रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळला आहे. पुरंदर तालूक्यातील बेलसर या ठिकाणी झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळल्यानं जिल्हा प्रशासनाची आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे.
बेलसरमध्ये तपासणी होणार
राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रदीप आवटे यांनी महाराष्ट्रात झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळ्याची माहिती दिली. झिका विषाणूचा संसर्ग झालेल्या 50 वर्षीय महिला रुग्णाची हिस्ट्री तपासणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं देखील यासंदर्भात ट्विट केलं आहे. झिकाचा संसर्ग झालेल्या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागानं दिली आहे.
The first case of Zika virus reported in Maharashtra. A 50-year-old woman patient was found in Purandar tehsil in Pune district. The patient is doing fine: Maharashtra Health Department
— ANI (@ANI) July 31, 2021
झिका विषाणुची लक्षणं कोणती?
झिकाचे पहिले लक्षण म्हणजे ताप येणे, अंगदुखणे, अंगावर लाल रंगाचे चट्टे येणे तसेच या व्हायरल दरम्यान प्रचंड डोकेदुखी होते, डोळे लाल होणे, अशक्तपणा आणि थकवा हे देखील या व्हायरलचे प्रमुख लक्षण आहे. मात्र, सुरूवातीला आलेल्या तापावरून झिका व्हायरल कळणे थोडे कठीण आहे.
झिकापासून वाचण्यासाठी काय करावं
झिका व्हायरसवर असे काही विशिष्ट औषध नाहीये. मात्र, झिका व्हायरसच्या दरम्यान आपण जास्तीत-जास्त पाणी पिले पाहिजे. झिका व्हायरलमध्ये साधेदुखीचा त्रास अधिक होतो. यामुळे आपण जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. झिका व्हायरसमध्ये जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा.
झिका व्हायरसवर लस किंवा उपचार नाही
सध्या झिका व्हायरसला कोणतीही लस किंवा उपचार नाही. झिका व्हायरसमध्ये आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर गंभीर परिणाम होतो. गर्भवती महिलांमध्ये हा संसर्ग विकसनशील गर्भास गंभीरपणे हानी पोहोचवू शकतो आणि जन्मजात विसंगती होऊ शकतात. हा झिका व्हायरस डासांमुळे होतो.
इतर बातम्या:
झिका विषाणूचा धोका वाढला, केरळात एका शहरात 14 रुग्ण, तामिळनाडू सरकार अलर्ट, सीमेवर बंदोबस्त वाढवला
कोरोनानंतर आता झिका व्हायरसचा धोका वाढला, पाहा लक्षणं कोणती आणि लागण कशी होते?
Zika virus first case reported in Maharashtra patient was found in Belsar village of Purandar tehsil in Pune district