पुणेरी पाट्या ‘लय भारी’, अंतिम टप्प्यातही प्रचाराची वाढली रंगत भारी

प्रचारा दरम्यान पुणेरी पाट्या न लागल्याने काही तरी चुकल्यासारखे वाटत होते. पण, अखेर प्रचाराच्या अंतिम टप्प्यात का होईना पुणेरी पाट्या ठिकठिकाणी झळकू लागल्या आहेत.

पुणेरी पाट्या 'लय भारी', अंतिम टप्प्यातही प्रचाराची वाढली रंगत भारी
KASBAPETH BY ELECTIONImage Credit source: TV9 NETWORK
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 10:47 AM

पुणे : निवडणूक मग त्या कोणत्याही असो पुणेरी पाट्या लागल्याशिवाय त्या निवडणूक संपतच नाहीत. कसबा पोटनिवडणूकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. २७ फेब्रुवारीला मतदान होऊन निकाल २ मार्चला जाहीर होणार आहे. मात्र, येथील प्रचारा दरम्यान पुणेरी पाट्या न लागल्याने काही तरी चुकल्यासारखे वाटत होते. पण, अखेर प्रचाराच्या अंतिम टप्प्यात का होईना पुणेरी पाट्या ठिकठिकाणी झळकू लागल्या आहेत. कसबा पोटनिवडणुकीत आतापर्यंत सर्वच पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली आहे.

कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात प्रमुख वाढत आहे. तर, हिंदू महासंघाचे आनंद दवे हे ही या निवडणुकीत उतरल्याने येथे तिरंगी लढत होत आहे. प्रचाराचा शेवटच्या टप्प्यात आज भाजपने येथ मोठी रॅली काढली आहे. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ सहभागी झाल्या आहेत. याच दरम्यान कसबा मतदारसंघात पुणेरी पाट्या झळकल्या असून त्यांनी शहर वासियांचे लक्ष वेधले आहे.

हे सुद्धा वाचा

KASBAPETH BY ELECTION

काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या समर्थनार्थ या पाट्या लागल्या आहेत. या पाट्यांवर भाजप उमेदवारांना चांगलेच चिमटे काढण्यात आल्याने भाजप कार्यकर्त्यांनी त्यावर आक्षेप घेत पोलिसांकडे धाव घेतली आहे. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी या पाट्या लावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

राहुल जाधव नावाच्या या कार्यकत्याने पाट्या लावल्या असून त्याच्यासोबत आणखी दोन सहकारी होते असा दावा भाजपने केला आहे. दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीतील मतदारांचे भवितव्य २७ फेब्रुवारीला मतदान पेटीत बंद होत असून 02 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

( टीप : टीव्ही9 मराठी कोणत्याही उमेदवारचा प्रचार करत नाही. )

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.