एका दिवसात 30 कि.मी. रस्त्याचं डांबरीकरण, महाराष्ट्राच्या एकसष्टीनिमित्त अनोखा विक्रम

जवळपास 474 कामगार आणि 250 वाहने व मशिनरीच्या साहाय्याने हे काम पूर्ण करण्याचे सुरू आहे. road construction world record in Satara

एका दिवसात 30 कि.मी. रस्त्याचं डांबरीकरण, महाराष्ट्राच्या एकसष्टीनिमित्त अनोखा विक्रम
डांबरीकरणाचं काम
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 2:08 PM

सातारा: जिल्ह्यातील पुसेगाव- म्हासुर्णे मार्गावर एका दिवसात 30 किलोमीटर रस्ता तयार करण्याचा विक्रम करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या एकसष्टीनिमित्त राजपथ इन्फ्राकॉन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्याला अनोख्या स्वरूपात अभिवादन केले आहे. या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही झाली आहे. या अनोख्य विक्रमाबद्दल राजपथ इन्फ्राकॉन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीं माहिती देण्यात आली. (PWD and Rajpath Infracon make record by making road construction world record in Satara )

पुसेगाव ते म्हासुर्णे या मार्गावर 30 कि.मी डांबरीकरण

सातारा जिल्ह्यातील पुसेगाव ते म्हासुर्णे या मार्गावर चोवीस तासात 30 किलोमीटर लांबीचा रस्ता एका दिवसात तयार करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राजपथ इन्फ्राकॉनने विश्वविक्रम स्थापित केला आहे. या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही झाली आहे. रविवारी दि. 30 मे रोजी सकाळी 7 वाजलेपासुन रात्री 2 वाजे पर्यंत डांबरीकरण करण्यात आलं. या आधीचा विश्वविक्रम हा 25. 54 किलोमीटरचा आहे. पुसेगाव, जायगाव, औंध, म्हासूर्णे साडेतीन मीटर रुंद आणि 47 किलोमीटर लांबीचा असा हा रस्ता आहे. त्यापैकी तीस किलोमिटरचा रस्ता एका दिवसात तयार करण्यात आला.

474 कामगार आणि 250 वाहने व मशिनरीच्या साहाय्याने विक्रम

जवळपास 474 कामगार आणि 250 वाहने व मशिनरीच्या साहाय्याने हे काम पूर्ण करण्याचे सुरू आहे. कोविडसंदर्भात केंद्र व राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या विश्वविक्रमातून महाराष्ट्राच्या एकसष्टीनिमित्त राजपथ इन्फ्राकॉन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्याला अनोख्या स्वरूपात अभिवादन केले आहे, असं सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उल्हास देबडवार यांनी सांगितलं.

राजपथ टीमचं सूक्ष्म नियोजन विक्रमी प्रयत्नांची अंमलबजावणी करण्यासाठी राजपथ टीमने सूक्ष्म नियोजन केले. 30 किलोमीटरच्या या रस्त्याला सहा तुकड्यांमध्ये विभागण्यात आले. प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पथक होते. या कामासाठी एकूण 11 हजार मेट्रीक टन बिटुमन काँक्रीट, त्यासाठी आठ हॉट मिक्स प्लांट होते. काँक्रीटचे हे मटेरीअल पसरविण्यासाठी सही पेव्हर, 12 टँडम रोलर व 6 पीटीआर वापरण्यात आले. या मटेरीअलची ने-आण करण्यासाठी एकूण 180 हायवा टिप्पर गाडी वापरण्यात आले.

प्रकल्प व्यवस्थापक, तीन हायवे इंजिनिअर, दोन क्लालिटी इंजिनिअर, दोन सर्व्हेअर आणि 71 कर्मचारी असे एकूण 79 कर्मचारी एका टीममध्ये होते. एकूण सहा भागांचे मिळून 474 कर्मचारी पुर्ण कामासाठी तैनात होते. यासाठी व्यवस्थापन थिंक टँक व वॉर रूम उभारण्यात आली होती.

संबंधित बातम्या:

कृष्णा साखर कारखाना निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी उमदेवारांची लगबग, सत्ताधारी पॅनेल विरोधात विरोधकांची एकजूट?

Maharashtra Lockdown : राज्यातील लॉकडाऊन वाढवला, 15 जूनपर्यंत निर्बंध कायम राहणार

(PWD and Rajpath Infracon make record by making road construction world record in Satara )

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.