‘आबा आज तुम्ही गृहमंत्री असायला हवं होतं, तुमची खूप आठवण येतेय’
आबा आज तुमची खूप आठवण येतेय, गृहमंत्री म्हणून राज्याला आपणच पाहिजे होता. | R R Patil
मुंबई: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (parambir singh letter bomb) यांनी आर्थिक भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर महाविकासआघाडी सरकारची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर समाजातील विविध स्तरावरून उद्विग्न आणि संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. (Parambir Singh accusations on Anil Deshmukh)
मराठा आरक्षण खटल्यातील याचिकाकर्ते विनोद पाटील यांनीही शनिवारी एक ट्विट करुन यासंदर्भात भाष्य केले. त्यांनी राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. आबा आज तुमची खूप आठवण येतेय, गृहमंत्री म्हणून राज्याला आपणच पाहिजे होता, अशी भावना विनोद पाटील यांनी व्यक्त केली.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात आर. आर. पाटील यांची गृहमंत्रीपदाची कारकीर्द विशेष गाजली होती. या काळात आबांनी पोलीस भरती आणि डान्सबार बंदीचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या धडाडीचे सामान्य लोकांकडून प्रचंड कौतुक झाले होते.
आबा आज तुमची खूप आठवण येतेय, गृहमंत्री म्हणून राज्याला आपणच पाहिजे होता… pic.twitter.com/kW5OdGGHRN
— Vinod Patil (@vnpatilofficial) March 20, 2021
आर.आर. पाटील अशावेळी तात्काळ कारवाई करायचे; सचिन वाझे प्रकरणात मनसेच्या नेत्याची प्रतिक्रिया
काही दिवसांपूर्वी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही आर.आर. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला होता. रकारच्या चुका लक्षात आणणं हे विरोधकांचे काम आहे. आर.आर. पाटील (R R Patil) हे जर आमचं म्हणणं योग्य असेल तर संबंधितांवर ताबडतोब कारवाई करायचे, अशी आठवण बाळा नांदगावकर यांनी सांगितली होती.
मुंबई पोलिसांना 100 कोटींचं टार्गेट तर महापालिकेचा आकडा किती असेल; मनसेचा सवाल
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आक्रमक झाली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन शिवसेनेच्या कारभारावर आगपाखड केली आहे.
मुंबई पोलिसांना 100 कोटी जमा करण्याचे टार्गेट सरकारने दिले होते. मग मुंबई महानगरपालिकेला किती पैसे वसूल करण्याचं टार्गेट असेल , असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला. हीच ती वेळ वीरप्पन गँगला कायमचं क्वारंटाईन करण्याची, असेही संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
संबंधित बातम्या:
आर.आर. पाटील अशावेळी तात्काळ कारवाई करायचे; सचिन वाझे प्रकरणात मनसेच्या नेत्याची प्रतिक्रिया
आयुक्तांच्या लेटरबॉम्बनंतर ठाकरे सरकार अडचणीत; संजय राऊतांचं सूचक ट्विट
Parambir Singh Letter : परमबीर सिंग यांच्या ‘लेटर बॉम्ब’ची राज्य सरकारकडून शहानिशा होणार!
(Param Singh accusations on Anil Deshmukh)