Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अण्णा हजारेंचा ‘लाव रे तो व्हिडीओ’चा इशारा, मनधरणीसाठी भाजप नेत्यांची राळेगणसिद्धीत रीघ

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही राळेगणसिद्धी इथं जात अण्णा हजारे यांची भेट घेणार आहेत. तत्पूर्वी विखे पाटील आज राळेगणसिद्धीत दाखल झाले आहेत.

अण्णा हजारेंचा 'लाव रे तो व्हिडीओ'चा इशारा, मनधरणीसाठी भाजप नेत्यांची राळेगणसिद्धीत रीघ
Follow us
| Updated on: Jan 22, 2021 | 7:11 PM

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर भाजपच्या गोटात मोठी खळबळ माजली आहे. माजी मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज राळेगणसिद्धी इथं जात अण्णांची भेट घेतली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही राळेगणसिद्धी इथं जात अण्णा हजारे यांची भेट घेणार आहेत. तत्पूर्वी विखे पाटील आज राळेगणसिद्धीत दाखल झाले आहेत. अण्णा हजारे यांनी 30 जानेवारी रोजी आंदोलना इशारा दिला आहे.(Radhakrishna Vikhe Patil in Ralegan Siddhi to meet senior social activist Anna Hazare)

अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर 30 जानेवारी 2021 रोजी उपोषणाचा इशारा दिला आहे. काही वर्षांपूर्वी मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करुन देण्यासाठी अण्णा हजारे आता उपोषण करणार आहेत. अण्णांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर केंद्रातील सत्ताधारी भाजप नेत्यांमध्ये खळबळ माजली आहे. राजधानी दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकऱ्यांचं गेल्या 58 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये आज चर्चेची 11वी फेरी पार पडली आहे. पण अद्याप कृषी कायद्याबाबत तोडगा निघालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांचं उपोषण सरकारसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता भाजप नेते अण्णांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

आता अण्णाही ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणणार

काही वर्षांपूर्वी मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करुन देण्यासाठी अण्णा हजारे आता जुने व्हिडीओ प्रसारित करणार आहेत. स्वामीनाथन आयोगाप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव द्यावा, केंद्रीय कृषिमूल्य आयोगास स्वायत्तता द्यावी या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आग्रही आहेत. मात्र आधी काँग्रेसने, तर आता भाजपने अण्णांना आश्वासनाच्या पलीकडे काहीही दिलेले नाही, असा आरोप अण्णांनी केलाय. 2011 मध्ये अण्णा दिल्लीत उपोषणाला बसले होते. त्यावेळी संपूर्ण देश अण्णांच्या आंदोलनात सहभागी झाला होता. त्याची मोठी किंमत काँग्रेसला चुकवावी लागली. मात्र त्यावेळी भाजप नेत्यांनी त्याचा फायदा घेत अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर अण्णांच्या मागण्या आम्ही पूर्ण करू, असं आश्वासन दिलं. मात्र पुढे सरकार येऊनही भाजपने देखील अण्णांच्या मागण्यांकडे दुर्लक्षच केलं.

या घटनाक्रमामुळेच अण्णा हजारे यांनी नवी शक्कल लढवलीय. आपल्याला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी अण्णांनी एक नवी रणनीती तयार केलीय. यानुसार अण्णा ज्या नेत्यांनी आतापर्यंत विविध आश्वासनं दिली, त्यांचे जुने व्हिडीओ एकत्र करून प्रसारित करणार आहेत. म्हणजेच अण्णा देखील आता मनसे प्रमुख यांच्या स्टाईलने ‘लावरे तो व्हिडीओ’ असं म्हणणार असल्याचं चित्र आहे.

मोदींसह या 9 प्रमुख नेत्यांना आश्वासनांची आठवण करुन देणार

2014 च्या निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसह अण्णा हजारे यांच्या कार्याचे कौतुक करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रविशंकर प्रसाद, निर्मला सीतारामन यांच्यासह 9 प्रमुख नेत्यांच्या प्रतिक्रियांचे व्हिडीओ आहेत. ते सोशल मीडियावर व्हायरल केले जाणार आहेत. त्यामुळे येत्या 30 जानेवारीच्या आंदोलनांची पूर्ण तयारी अण्णांनी केल्याचं दिसतंय.

संबंधित बातम्या :

‘संकटमोचक’ गिरीश महाजन अण्णांच्या भेटीला, शेतकरी आंदोलनात न उतरण्यासाठी भाजपची डिप्लोमसी?

भाजपला अण्णांची भीती?, बागडे राळेगणसिद्धीत; दीड तास खलबतं

Radhakrishna Vikhe Patil in Ralegan Siddhi to meet senior social activist Anna Hazare

'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू.
कामरानं शिंदेंना गद्दार म्हटलं पण दादांचा व्हिडीओ होतोय व्हायरल
कामरानं शिंदेंना गद्दार म्हटलं पण दादांचा व्हिडीओ होतोय व्हायरल.
कामराच्या त्या गाण्यावर शिंदें स्पष्टच म्हणाले, मी दुर्लक्ष केलं पण...
कामराच्या त्या गाण्यावर शिंदें स्पष्टच म्हणाले, मी दुर्लक्ष केलं पण....
राज्यात अवकाळीचा कहर, भर उन्हात 'या' जिल्ह्यात पाऊस अन् बळीराजा चिंतेत
राज्यात अवकाळीचा कहर, भर उन्हात 'या' जिल्ह्यात पाऊस अन् बळीराजा चिंतेत.
'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं
'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं.
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.