Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राधाकृष्ण विखे पाटील खासदार दिलीप गांधींच्या भेटीला

अहमदनगर : काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपचे अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांची भेट घेतली. ही भेट कशासाठी होती हे समजलं नसलं तरी नगरमधील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. विखेंचे चिरंजीव सुजय विखे हे भाजपचे नगर दक्षिणचे उमेदवार आहेत. तिकीट कापल्यामुळे नाराज असेलेल्या दिलीप गांधींची राधाकृष्ण विखेंनी भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. खासदार दिलीप […]

राधाकृष्ण विखे पाटील खासदार दिलीप गांधींच्या भेटीला
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

अहमदनगर : काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपचे अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांची भेट घेतली. ही भेट कशासाठी होती हे समजलं नसलं तरी नगरमधील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. विखेंचे चिरंजीव सुजय विखे हे भाजपचे नगर दक्षिणचे उमेदवार आहेत. तिकीट कापल्यामुळे नाराज असेलेल्या दिलीप गांधींची राधाकृष्ण विखेंनी भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय.

खासदार दिलीप गांधींशी आपण चर्चा केली असून त्यांचाही आपल्याला पाठिंबा असल्याचं सुजय विखेंनी नुकतंच म्हटलं होतं. त्यामुळे राधाकृष्ण विखेंची ही भेटही नाराजी दूर करण्यासाठीच तर नव्हती ना, असाही प्रश्न उपस्थित होतो. कारण, राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुलासाठी विविध ठिकाणी बैठका सुरु केल्या असल्याचंही बोललं जातंय.

राधाकृष्ण विखे पाटील हे सध्या काँग्रेसमध्येच असले तरी आपण आघाडीच्या उमेदवाराचा नगरमध्ये प्रचार करणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय. राष्ट्रवादीने काँग्रेसला नगरची जागा न सोडल्याने सुजय विखेंनी भाजपात प्रवेश केला होता. राष्ट्रवादीने विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना नगरमधून उमेदवारी दिली आहे.

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.