“अजित पवार यांनी तमाम हिंदू धर्मियांचा अपमान केलाय”: पवारांविरोधात शिर्डीत भाजप रस्त्यावर….
राधाकृष्ण विखे पाटील यांनी बोलताना सांगितले की, धर्मवीर संभाजीमहाराज यांच्याबद्दल जे विधान केले आहे त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.
शिर्डीः हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधक आणि सत्ताधारी असा सामना रंगलेला असतानाच हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्वराज्यरक्षक म्हणून वक्तव्य केले होते. त्यावरून विरोधकांसह शिंदे गटानेही अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढविण्यात आला होता.
अजित पवार यांनी संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षक होते असं वक्तव्य केल्यामुळे त्यांनी हिंदू धर्मियांचा अपमान केला असल्याची टीका करत भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्याविरोधात शिर्डीमध्ये जोरदार मोर्चा काढला.
छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षक होते असं वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम हिंदू धर्मियांचा अजित पवार यांनी अपमान केल्याची टीका करत महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसह शिर्डीत मोर्चा काढला.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मोठ्या संख्येने हा मोर्चा काढण्यात आला होता.
अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत साईआश्रम चौकापासून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होात. या मोर्चामध्ये टाळ, मृदूंग घेत वारकरीदेखील सामील झाले होते. यावेळी अजित पवार यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी विखे-पाटील यांनी केली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी बोलताना सांगितले की, धर्मवीर संभाजीमहाराज यांच्याबद्दल जे विधान केले आहे त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.
छत्रपती संभाजी महाराज हे हिंदू धर्माचे प्रतीक होते. त्यामुळे ते धर्मवीर नव्हते असं वक्तव्यं केलेल्या अजित पवार यांचा आम्ही निषेध करतो असंही त्यांनी यावेळी सांगितले.
त्यामुळे संभाजीराजे हे धर्मवीर होते आणि राहणार. ते त्यांच्याकडून कोणीही काढून घेऊ शकत नाही. अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे तमाम हिंदू धर्माचा अपमान अजित पवार यांनी केला आहे असा जोरदार हल्लाबोलही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.