‘रोक सको तो रोक लो!’ ट्विटरवर ट्रेंड, कुणाचं कुणाला आव्हान?

| Updated on: Dec 24, 2022 | 4:37 PM

'रोक सको तो रोक लो!' ट्विटरवर ट्रेंड, वाचा सविस्तर...

रोक सको तो रोक लो! ट्विटरवर ट्रेंड, कुणाचं कुणाला आव्हान?
Follow us on

मुंबई : ट्विटरवर एक हॅशटॅग सकाळपासून ट्रेंड होतोय. #रोक_सको_तो_रोक_लो (Rok Sake To Rok lo) हा हॅशटॅग सध्या ट्विटरवर ट्रेड होत आहे. हा हॅशटॅग भारतीय राजकारणाशी संबंधित आहे. सध्या काँग्रेसची भारत जोडो यात्रा चालली आहे. आज ही यात्रा दिल्लीत दाखल झाली. पण या भारत जोडो यात्रेवर (Bharat Jodo Yatra) बंदी घालण्याची मागणी होत आहे आणि याच्याशीच संबंधित #रोक_सको_तो_रोक_लो हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहे.

चीनमध्ये कोरोनो वाढतो आहे. कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट भारतात येण्याची भिती आहे. अशात सरकारकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. गर्दी टाळण्याचं आवाहन केलं जात आहे. अशातच हजारो लोक रस्त्यावर चालत असलेल्या भारत जोडो यात्रेवर बंधनं घातली जावीत. ही यात्रा बंद करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.


याचा विरोध करण्यासाठी काँग्रेस आणि त्यांच्या समर्थकांकडून हा #रोक_सको_तो_रोक_लो हा हॅशटॅग वापरून ट्विट केलं जात आहे. आमच्यासोबत जनता आहे.त्यामुळे आम्हाला रोखण्याची हिंमत कोणात नाही, अशा आशयाचे ट्विट केले जात आहेत.

रोक सको रोक लो हे वाक्य राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान अनेकदा वापरलं अन् मोदी सरकारला आव्हान दिलं. कुठलंही संकट आम्हाला रोखू शकत नाही, असं राहुल गांधी वारंवार म्णताना दिसले.

#रोक_सको_तो_रोक_लो या हॅशटॅगला टॅग करत ट्विट करत काँग्रेसच्या वतीने सरकारला इशारा देण्यात येत आहे.