“भाजप सरकार मुर्दाबादच्या घोषणा देत राष्ट्रीय महामार्ग अडविला”; भाजप विरोधात काँग्रेस आक्रमक
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली गेल्यामुळे काँग्रेस आक्रमक होत आता अनेक ठिकाणी भाजपविरोधात रस्त्यावर उतरली आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळणार असल्याचे दिसून येत आहे.
गडचिरोली : गेल्या दोन दिवसांपासून देशाचे राजकारण ढवळून निघाले आहे. कारण होतं, राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे तर त्यानंतर त्यांची खासदारकीही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आली आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यामुळे काँग्रेसने देशभर आंदोलनाचा नारा दिला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात काँग्रेसने भाजपविरोधात जोरदार आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या समर्थनात भाजपच्या निषेधार्थ आरमोरी राष्ट्रीय महामार्गावर रस्त्यावर उतरून काँग्रेसने भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.
आरमोरी राष्ट्रीय महामार्गावर उतरून काँग्रेसने आंदोलन करत भाजपकडून लोकशाहीला धोका निर्माण झाला असल्याची टीका करण्यात आली आहे.
राहुल गांधी आगे बढो हम तुम्हारे साथ है असेही यावेळी नारे देण्यात आले आहेत. काँग्रेसच्या नेत्याची खासदारकी भाजपकडून रद्द करण्यात आल्याने भाजपविरोधात काँग्रेसकडून पुढील वर्षभर हे आंदोलन केले जाणार असा इशाराही काँग्रेसने दिला आहे. त्यामुळे भविष्यात भाजप आणि काँग्रेस असे युद्ध रंगणार असल्याचेच चित्र दिसून येत आहे.
काँग्रेसने ज्या प्रमाणे राहुल गांधी आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणा दिल्या आहेत. त्याच प्रमाणे त्यांनी भाजपविरोधातही जोरदार घोषणाबाजी केली आहे. भाजप सरकार मुर्दाबादचे नारे देत आरमोरी राष्ट्रीय महामार्ग घोषणांनी दुमदूमून गेला आहे.
भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळेच त्यांच्या दबाव आणण्यासाठी भाजप सरकारकडून त्यांची खासदारकी रद्द केल्याचा गंभीर आरोपही काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली गेल्यामुळे काँग्रेस आक्रमक होत आता अनेक ठिकाणी भाजपविरोधात रस्त्यावर उतरली आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळणार असल्याचे दिसून येत आहे.