Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे आहोत’ राऊतांना राहुल गांधींचं पत्र

राज्यात ईडीने (ED) कडक कारवाई करण्यास सुरूवात केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी राहुल गांधींचे पत्र शेअर केले आहे. या पत्राच्या माध्यमातून संजय राऊतांना राहुल गांधींनी काँग्रेसाचा पाठिंबा असल्याचे सांगितले आहे.

'आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे आहोत' राऊतांना राहुल गांधींचं पत्र
राहुल गांधींचे संजय राऊतांना पत्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 5:57 PM

मुंबई : राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यातला सलोखा मागील काही दिवसात संपूर्ण देशाने पाहिला आहे. विविध राजकीय मुद्द्यांवरून दोन्ही नेते अनेकदा एका व्यासपीठावर दिसून आलेत. राज्यात ईडीने (ED) कडक कारवाई करण्यास सुरूवात केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी राहुल गांधींचे पत्र शेअर केले आहे. या पत्राच्या माध्यमातून संजय राऊतांना राहुल गांधींनी काँग्रेसाचा पाठिंबा असल्याचे सांगितले आहे. 15 फेब्रुवारीच्या पत्रात गांधींनी राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्रास देण्यासाठी आणि धमकावल्याबद्दल अनेक केंद्रीय संस्थांचा निषेध केला. सीबीआय, ईडी, एनसीबी मार्फत खासदार आणि आमदारांना धमकावून महाविकास सरकार पाडण्याचा प्रयत्न केंद्रावर केल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सारख्या पत्रकार परिषदा घेत संजय राऊत ईडीला तोंड देत आहेत.

राऊतांकडून राहुल गांधींचे पत्र ट्विट

राहुल गांधींनी पत्रात काय म्हटलंय?

पत्रात राहुल गांधी म्हणाले आहेत की, संजय राऊत मला आशा आहे की तुम्हाला माझे पत्र मिळाले असेल. राहुल यांनी लिहिले की, माझे हे पत्र तुम्ही राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना 8 फेब्रुवारीला लिहिलेल्या पत्राच्या समर्थनार्थ आहे. केंद्रीय तपास यंत्रणा ज्या प्रकारे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला टार्गेट करत आहेत, त्याचा मी निषेध करतो. पत्रात तुम्ही ज्या प्रकारे तपास यंत्रणांकडून छळवणूक आणि धमक्यांची उदाहरणे दिली आहेत, त्यातून मोदी सरकारचा पर्दाफाश होत आहे. तपास यंत्रणांचा सततचा गैरवापर लोकशाहीसाठी घातक असल्याचे राहुल यांनी लिहिले आहे. या सरकारला विरोधकांना गप्प करायचे आहे. काँग्रेस पक्ष सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, याची मी खात्री देतो. असे ते पत्रात म्हणाले आहेत.

संजय राऊत काय म्हणाले?

तर दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधींनी लिहिलेल्या पत्राचा फोटो शेअर करत ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी राहुल गांधींचे आभार मानत लिहले आहे की, लोकशाही मूल्ये आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्याच्या आपल्या प्रयत्नात आपण एकत्र लढले पाहिजे. केंद्रीय एजन्सी एका पक्षाच्या गुलामाप्रमाणे वागत आहेत हे दुर्दैवीच नाही तर धोकादायकही आहे. पण मला खात्री आहे की ही वेळ देखील निघून जाईल. शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र सरकार कधीही कोणावर खोटे गुन्हे नोंदवत नाही, परंतु एनसीबी, सीबीआय आणि ईडी सारख्या राष्ट्रीय संस्था भाजपकडून काम करत आहेत आणि खोटे खटले दाखल करत आहेत. फडणवीस यांनी संयम बाळगावा कारण त्यांच्या खळबळजनक वक्तव्यामुळे राज्य पोलिसांची प्रतिमा मलीन होत आहे, असेही राऊत म्हणाले आहेत.

फडणवीसांच्या गंभीर आरोपानंतर विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण गायब? कार्यालयालाही टाळं!

चुंबन, चॅटिंग आणि लॉज, पडळकरांनी काढली पोलिसांची प्रकरणं, नेमके आरोप काय?

दुसऱ्याच्या बायकोच्या हातावर पोलीस अधिकाऱ्याचा टॅटू, महिलांच्या सुरक्षेवरून पडळकरांनी काढले वाभाडे

स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.