नव्या सरकारचा शपथविधी कधी?; राहुल नार्वेकरांनी तारीख सांगितली

Rahul Narvekar on Maharashtra Government Formation : महाराष्ट्रात नवं सरकार कधी अस्तित्वात येणार? नव्या सरकारचा शपथविधी कधी पार पडणार? असे प्रश्न सध्या महाराष्ट्रभर चर्चेत आहेत. अशातच राहुल नार्वेकर यांनी सत्तास्थापनेची तारीख सांगितली आहे. वाचा सविस्तर बातमी...

नव्या सरकारचा शपथविधी कधी?; राहुल नार्वेकरांनी तारीख सांगितली
राहुल नार्वेकर, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 2:03 PM

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला 230 जागा मिळाल्या. त्यामुळे सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला. मात्र अद्यापपर्यंत महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदावर दावा केला. मात्र भाजपच्या 132 जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष ठरल्याने भाजपने मुख्यमंत्रिपद आपल्याकडे ठेवल्याची माहिती आहे. तर आता गृहमंत्रिपद मिळावं, यासाठी एकनाथ शिंदे यांनी मागणी केली आहे. मात्र भाजप गृहमंत्रिपद द्यायला तयार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे महायुती सरकारचा शपथविधी रखडला आहे. अशातच भाजपचे वरिष्ठ नेते आणि कुलाबा मतदारसंघाचे आमदार राहुल नार्वेकर यांनी महायुती सरकारच्या शपथविधीची संभाव्य तारीख सांगितली आहे.

नव्या सरकारचा शपथविधी कधी?

विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर राहुल नार्वेकर साई दरबारी पोहचले. साईंच्या समाधीचं दर्शन घेतलं. राज्याला सक्षम सरकार मिळालं आहे. राज्याचे कल्याण होवो, अशी प्रार्थना राहुल नार्वेकरांनी साईं चरणी केली. यावेळी 5 तारखेच्या सुमारास शपथविधी होऊन सरकार स्थापन होणार आहे, असं राहुल नार्वेकर म्हणालेत.

महायुती सरकारमध्ये मंत्रिपदाची अपेक्षा आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हाजनतेने मोठ्या विश्वासाने हे सरकार निवडून दिलं आहे. जनतेने भाजपला आणि महायुतीला अभूतपूर्व संख्याबळ दिलं आहे. हे सरकार येणाऱ्या पाच वर्षात राज्याला समृध्दी आणि भरभराटी मिळवून देणार आहे. माझ्या पक्षाने मला न मागता खूप काही दिलेलं आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडेल, असं नार्वेकर म्हणाले.

ईव्हीएमवरून विरोधकांना टोला

यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. त्यानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर संशय घेण्यात आला. त्यावरून नार्वेकरांनी विरोधकांना टोला लगावला आहे. विरोधकांकडून सातत्याने रडीचा खेळ आहे. लोकसभा EVM वरच झाल्या आहेत. त्यावेळी विरोधकांनी निवडणूक आयोगाचे कौतुक केलं. जेव्हा इच्छे विरुद्ध काही होतं तेव्हा विरोधक संबंधित संस्थेला दोषी ठरवतात. सर्वोच्च न्यायालय, लोकसभा अध्यक्ष, निवडणूक आयोग सर्वांवर टीका करतात. संविधानिक संस्थांवर यांचा विश्वास नाही. संविधानाबद्दल यांच्या मनात किती आदर आहे हे यातून दिसून येत आहे, असं राहुल नार्वेकर म्हणालेत.

आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.